Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साईबाबा संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांना ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार

November 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
Bhagyashree Banayat

मुक्तपीठ टीम

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार’ ऑनलाईन प्राप्त झाला आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयात संचालक पदावरून त्यांनी राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम व सर्वांगीण कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.

नवी दिल्ली स्थित स्कॉच फाऊंडेशन यांच्या वतीने २००३ पासून स्कॉच पुरस्कार दिला जातो. ऑस्कर पुरस्काराच्या धर्तीवर भारतात दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार आहे. ऑनलाईन सोहळ्यात हा पुरस्कार बानायत यांना जाहीर करण्यात आला. यावेळी ऑनलाईन प्रमाणपत्र त्यांना देण्यात आले. प्रशासनात राबविलेल्या उत्कृष्ट उपक्रमांबद्दल त्यांना रजत पदक देण्यात आले आहे. कठोर निकष व मूल्यांकनातून गव्हर्नन्स मध्ये दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्कारावर यंदा महाराष्ट्रातून श्रीमती बानायत यांनी मोहोर उमटवली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सार्वजनिक क्षेत्र, शासकीय विभागात गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या अधिकारी व संस्थांची निवड समितीद्वारे मूल्यांकन, नागरिकांचे मतदान अशा परिमाणांवर कामांचे प्रमाणिकरण व परीक्षण करून कडक निकषांच्या मूल्यांकन प्रक्रियेद्वारे ‘स्कॉच’पुरस्कारासाठी निवड करून सुवर्ण, रजत व कास्य पदक देण्यात येत असतो. या प्रक्रियेमुळे इतर पुरस्कारापेक्षा ‘स्कॉच’ पुरस्कार आगळावेगळा व उल्लेखनीय ठरतो.

या पुरस्काराबद्दल बानायत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, रेशीम संचालक असतांना राबविलेले उपक्रम व  नावीन्यपूर्ण कामाबद्दल मला हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार मला महाराष्ट्रातून ‘गव्हर्नन्स’ मध्ये केलेल्या कामासाठी मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्काराने प्रशासनात अजून चांगले काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे.


Tags: Bhagyashree BanayatScotch National AwardShirdi Sai Baba Instituteभाग्यश्री बानायतशिर्डी साईबाबा संस्थानस्कॉच राष्ट्रीय पुरस्कार
Previous Post

नवाब मलिकांचा नवा ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ गौप्यस्फोट! काशिफ खानला अटक का नाही?

Next Post

चंद्रकांत पाटील यांनी थांबवली ‘मी पुन्हा येईन’ चर्चा, आता प्रखर विरोधकाचीच भूमिका!

Next Post
chandrakant Patil

चंद्रकांत पाटील यांनी थांबवली 'मी पुन्हा येईन' चर्चा, आता प्रखर विरोधकाचीच भूमिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!