Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

November 14, 2021
in सरकारी बातम्या
0
Ajit pawar

मुक्तपीठ टीम

कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे. राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे सांगितले.

 

कर्जत शहरातील व तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी,आयोजित सभेत उपमुख्यमंत्री श्री .पवार बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, आमदार राजेंद्र पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचे संकट, निसर्ग,तौक्ते चक्रीवादळ, तसेच अतिवृष्टीमुळे आव्हाने उभी राहिली. परंतु ,आता आर्थिक परिस्थिती पूर्ववत होत आहे. विकासकामे करताना भेदभाव करण्यात येणार नाही. याबरोबरच वीज व पाणी यांचा वापर जपून करणे गरजेचे आहे.सार्वजनिक सुविधांच्या वापरातही शिस्त आवश्यक आहे .भविष्यात या भागात नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार असून तरुणांनी समाजकारण करण्यासाठी पुढे यावे.

 

शासनाने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून दिले तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकासकामे मुदतीत पूर्ण करतानाच त्याचा दर्जा उच्च प्रतीचा ठेवण्याचे निर्देश यावेळी श्री.पवार यांनी दिले.

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कर्जत तालुक्याच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जत तालुक्यातील विकास कामांचे कौतुक केले आणि ती अनुकरणीय असल्याचे सांगितले.

 

आज झालेल्या उद्घाटनात कर्जत पंचायत समिती विस्तारीत बांधकाम, बस डेपो व व्यापारी संकुल बांधकाम, तालुका प्रशासन प्रशासकीय इमारत बांधकाम, तलाठी कार्यालय, महसूल कर्मचारी निवासस्थाने, शासकीय विश्रामगृह बांधकाम तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहत निर्माण कामांचा समावेश आहे.


Tags: Dattatray bharaneDeputy Chief Minister Ajit PawarkarjatRajendra Pawarrohit pawarअजित पवारकर्जतदत्तात्रय भरणेराजेंद्र पवाररोहित पवार
Previous Post

वांद्रे रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणात फेरीवाल्यांची “लुडबूड” सुरुच

Next Post

जामखेड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

Next Post
Ajt pawar

जामखेड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!