मुक्तपीठ टीम
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दशकातील पहिल्या अधिवेशनात दशकाचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी या सत्रात संपूर्ण दशक लक्षात घेऊन चर्चा व्हाव्यात, सर्व प्रकारचे विचार मांडले जावेत आणि विचार मंथनातून अमृत प्राप्ती व्हावी अशी देशाची अपेक्षा आहे, असे मत मांडले.
तसेच कोरोना संकटामुळे 2020 मध्ये एक नव्हे तर अर्थमंत्र्यांना वेगवेगळ्या पॅकेजच्या स्वरुपात एका प्रकारे चार- पाच छोटेखानी अर्थसंकल्प द्यावे लागले, असा त्यांनी खास उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, 2020 मध्ये एका प्रकारे या छोटेखानी अर्थसंकल्पांची मालिका सुरूच राहिली. या अर्थसंकल्पाकडेही त्या चार-पाच छोटेखानी अर्थसंकल्पांतली मालिका म्हणूनच पहिले जाईल याचा मला विश्वास आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन त्यांच्याच शब्दात:
Speaking at the start of the Budget Session. https://t.co/qhQMTEXOsG
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2021
नमस्कार मित्रहो,
संसदेचे या दशकातले हे पहिले अधिवेशन सुरु होत आहे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध्येयाने झपाटलेल्या सर्वांनी जी स्वप्ने पाहिली, ती स्वप्ने, ते संकल्प वेगाने साकारण्यासाठी ही सुवर्ण संधी देशाकडे आली आहे. या दशकाचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी या सत्रात संपूर्ण दशक लक्षात घेऊन चर्चा व्हाव्यात, सर्व प्रकारचे विचार मांडले जावेत आणि विचार मंथनातून अमृत प्राप्ती व्हावी अशी देशाची अपेक्षा आहे.
देशाच्या कोट्यवधी जनतेने ज्या आशा-अपेक्षांसह आपल्याला संसदेत निवडून दिले आहे, त्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी, संसदेच्या या पवित्र स्थानाचा उपयोग करत, लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे पालन करत, आपले योगदान देण्यात आपण मागे राहणार नाही याचा मला विश्वास आहे. सर्व खासदार हे सत्र अधिक उत्तम करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.
हे अर्थसंकल्पीय अधिवेशनही आहे. भारताच्या इतिहासात कदाचित हे प्रथमच घडले असेल की 2020 मध्ये एक नव्हे तर वित्त मंत्र्यांना वेगवेगळ्या पॅकेजच्या स्वरुपात एका प्रकारे चार- पाच छोटेखानी अर्थसंकल्प द्यावे लागले. म्हणजेच 2020 मध्ये एका प्रकारे या छोटेखानी अर्थसंकल्पांची मालिका सुरूच राहिली. या अर्थसंकल्पाकडेही त्या चार-पाच छोटेखानी अर्थसंकल्पांतली मालिका म्हणूनच पहिले जाईल याचा मला विश्वास आहे.
मी पुन्हा एकदा आदरणीय राष्ट्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली, संसदेच्या दोन्ही सदनाच्या खासदारांसह त्यांचा संदेश पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे.
खूप- खूप धन्यवाद.