मुक्तपीठ टीम
दक्षिण कोरियाची सुप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी किया मोटर्स आपली ईव्ही लाइनअप वाढवण्याची योजना आखत आहे. या दिशेने वाटचाल करत, कंपनी आपल्या नवीन ईव्ही९ संकल्पनेच्या टीझरचा फोटो लाँच करणार आहे. लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये या टीझर फोटोचे अधिकृतपणे लाँचिंग करण्यात येणार आहे. समोर आलेल्या टीझर इमेजमध्ये या कारचे बाह्य प्रोफाइल पाहिले जाऊ शकते. यामधून ही कार मस्क्युलर आणि समोरून एक चौकोनी एसयूव्ही असल्याचे दिसते.
किया मोटर्सची ईव्ही९ देणार ५०० किमी पर्यंतची रेंज
- कियाने या कारबद्दल इतर कोणतीही माहिती उघड केलेली नाही. परंतु, ईव्ही९ त्याच ई-जीएमप आर्किटेक्चरवर आधारित असेल ज्यावर हुंडाई सेव्हेन संकल्पना आधारित आहे.
- १७ नोव्हेंबरला लॉस एंजेलिसमध्ये किया मोटर्ससह हुंडाई सेव्हेन कॉन्सेप्ट देखील लाँच करण्यात येईल.
- या प्लॅटफॉर्मवर आधारित इतर मॉडेल्सप्रमाणे, किया ईव्ही९ च्या या व्हर्जनमध्ये मोठ्या लिथियम-आयन बॅटरी, सिंगल आणि ड्युअल-मोटर पर्यायांची क्षमता असण्याची शक्यता आहे.
- त्याच वेळी, मिळालेल्या माहितीनुसार, ही कार एका चार्जमध्ये ५०० किमी पर्यंतची रेंज देईल.
- किया ईव्ही९ संकल्पनेच्या निर्मितीचे हे व्हर्जन २०२३ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सध्या, कियाची ईव्ही६ ही जगभर चर्चेत आहे. ही कार निवडक बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्या बाजारपेठांमध्ये या कारने चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेमध्ये, ही ईव्ही६ ज्यावेळेस लाँच करण्यात आली त्यावेळी बुकिंग सुरू झाल्याच्या काही तासांतच याची मोठ्याप्रमाणात विक्री झाली. कियाने हा दावा केला आहे की, जर ईव्ही६ ला फास्ट चार्जरने चार्ज केले तर, ते ११२ किमी अंतर पाच मिनिटांत आणि १८ मिनिटांत ३३० किमी पेक्षा जास्त अंतर पार करेल.