मुक्तपीठ टीम
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता मागासवर्गीय महिलांचे वसतिगृह, बोरिवली या वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मागविणे सुरू आहे.तरी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
वसतिगृहामधील प्रवेशासाठी नियमावली पुढीलप्रमाणे
- अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या वर्गवारीतील असावी.
- अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नेमणुकीच्या अथवा बदलीच्या आदेशाची प्रत अथवा रूजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.
- अर्जदाराचे जवळचे नातेवाईक उदा. आई, वडील, पती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हददीत रहात नसावेत.अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न हे रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे. अशा महिलांचे मासिक उत्पन्न यापेक्षा जास्त झाल्यास त्यांना वसतीगृह सोडावे लागेल.
- काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतिगृहात राहण्याची मुभा राहील.त्यानंतर त्यांना निवासस्थान सोडणे अनिवार्य राहील.
- वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी रु.५०००/- इतकी रक्कम अनामत रक्कम म्हणून वसतिगृहात व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत आहे तेथील सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले नेमणुकीचे अथवा बदलीचे आदेश तसेच तेथे रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र,वेतनाचे प्रमाणपत्र,सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने विहीत नमुन्यात दिलेला वैद्यकीय दाखला, दोन पासपोर्ट फोटो,ओळखपत्र (पासपोर्ट/ आधारकार्ड/संबंधित प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र) अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.