Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावित्री नदी पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खननासंदर्भात परिसर सर्वेक्षणाचा अहवालाची मागणी

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे महाड शहरात भविष्यातील पूरसदृष्य परिस्थिती टाळण्यासाठी निर्देश

November 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
सावित्री नदीच्या पात्रातील वाळू-खडी उत्खननाबाबतच्या कामाबाबत आढावा बैठक 1

मुक्तपीठ टीम

महाड परिसरात भविष्यात पुरामुळे दुर्घटना तसेच वित्त आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी जलदगतीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. सावित्री नदीच्या पात्रातील दगड, माती आणि वाळू उत्खनन करण्यासंदर्भात तेथील परिसराचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून तातडीने त्याचा अहवाल पर्यावरण विभागाच्या मान्यतेसह सादर करावा, गाळ काढण्याचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे असे निर्देश महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

 

महसूल मंत्री श्री. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सावित्री नदीच्या पात्रातील वाळू-दगड उत्खननाबाबतच्या कामाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भविष्यातील मनुष्यहानी व वित्तहानी टाळण्यासाठीच्या दृष्टीने जलदगतीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिका-यांना दिले. यावेळी बंदरे विकास विभागाचे मंत्री अस्लम शेख, माजी आमदार हुस्नबानो खलीफे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे संचालक श्री. टोके, मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील हे उपस्थित होते.  याचबरोबर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, या वर्षी सावित्री नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगड, माती, वाळूचा गाळ असल्याने तेथे पाणी साचून ते महाड शहरामध्ये जाते यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी होते. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या भागाचे पर्यावरणीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करावा. याचबरोबर गाळ उपसण्याच्या कामास गती द्यावी. आपत्ती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले. नदी पात्रातील गाळ काढण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील स्थानिकांना सांगितले होते. या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, असेही मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.


Tags: MahadmuktpeethRevenue Minister Balasaheb Thoratsavitri riversurvey reportपूर परिस्थितीमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातमहाडमुक्तपीठसर्वेक्षण अहवालसावित्री नदी
Previous Post

गुजरातच्या द्वारकेत ३५० कोटींचं ड्रग्स जप्त, राऊत-मलिकांचा भाजपाला टोला!

Next Post

त्रिपुरातील वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांविरोधात UAPAखाली गुन्हे! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणार!!

Next Post
supreme court 2

त्रिपुरातील वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांविरोधात UAPAखाली गुन्हे! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!