मुक्तपीठ टीम
इस्रोमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार जेटीओच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार २० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील करिअर कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केलीय आणि पदवी स्तरावर इंग्रजी हा विषय किंवा माध्यम म्हणून परीक्षा घेतलीय असे अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
२० नोव्हेंबर २०२१ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अनारक्षित पदांसाठी राखीव श्रेणींमध्ये उच्च वयोमर्यादेत कोणतीही सवलत दिली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज प्रक्रिया
- इस्रो ने एकूण ६ जेटीओ पदांसाठी अर्ज मागवलेत, त्यापैकी ५ पदे अनारक्षित आहेत, तर उर्वरित १ पद एससी उमेदवारांसाठी राखीव आहे.
- उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क
- ऑनलाईन अर्जादरम्यान उमेदवारांना २५० रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग) भरता येईल.
- इस्रोने उमेदवारांना ऑफलाईन फी भरण्याचा पर्याय देखील दिलाय आणि उमेदवार एसबीआय चलनाद्वारे अर्ज फी भरण्यास सक्षम असतील.
अधिक माहितीसाठी भारतीय इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in वरून माहिती मिळवू शकता.