मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये एम फिल, पीएचडी करणार्या अनुसूचित जाती-जमातीतीलविद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे फेलोशिप देण्यात येते. त्यानुसार कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर यातील ४०८ विद्यार्थी पात्र ठरले. व त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यात आली. मात्र, गेल्या पावने तीन वर्षापासून राज्यातील ४०८ विद्यार्थी फेलोशिपच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत वारंवार सामाजिक न्याय विभागाकडे तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची ठोस पाऊले उचलण्यात आली नाही. तर हा प्रश्न सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना माहिती असतानाही ते याकडे दुर्लक्षच करीत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रक्रियेत अडथळा येत असून विद्यार्थ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. जर दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर फेलोशिपची रक्कम जमा करण्यात आली नाही तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला.
जयदीप कवाडे यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक न्याय विभागासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेकडे फेलोशिप वितरित करण्याकरिता विद्यार्थी साकडे घालत पाठपुरावा घेत आहे. तरी ते जाणिवपूर्वक मागासवर्गीय उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल सामाजिक न्याय घेत नाही आहे. विशेष म्हणजे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे महाविकास आघाडी सरकारचेही लक्ष राहीले नाही, नसल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.
मुंडेनी दिलेला शब्द खोटा
गेल्या वर्षी फेलोशिच्या विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडेची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी ८ दिवसात यावर तोडगा काढून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु, दीड वर्षापासून त्यांनी यावर कुठालाही तोडगा काढला नाही. धनंजय मुंडेंनी विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन व शब्द हा पूर्णता खोटा ठरला. येत्या दिवाळीपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर फेलोशिपची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही. तर बार्टी आणि सरकारच्या विरोधात संशोधक विद्यार्थीसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी मंत्रालयासह बार्टीसमोर उपोषण, धरणे आंदोलन करण्याचा इशारा ही जयदीप कवाडे यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या
२०१८ या वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्र सर्वच ४०८ विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करुन ती सलग ५ वर्षे द्यावी, फेलोशिपसाठीची निर्धारित शैक्षणिक वर्षाच्या कालावधीची अट रद्द करुन २०१६-१७ च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, ४० वर्षे वयाची अट रद्द करावी, नेट आणि सेटची पात्रता ठेवू नका, रजिस्ट्रेशनसाठी शैक्षणिक वर्षाची अट ठेवू नका, एम.फिल व पीएचडी फेलोशिपच्या रकमेत वाढ करा, कुठलीही परीक्षा न घेता एम.फिल व पीएचडीच्या धरतीवर विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आंदोलन राहणार.