Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कृपाशंकर सिंहांची भाजपात कामगिरी सुरु, उत्तरप्रदेशातील मुंबईकर सपा आमदाराला फोडलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pasi join bjp

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील भाजपा ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ते. त्यानंतर ते उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी सक्रिय झाले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील सैदपूरचे सपा आमदार सुभाष पासी यांनी भाजपामध्ये आणण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली आहे. आमदार सुभाष पासी हे दहा वर्षेआधीपर्यंत मुंबईतील अंधेरीत ते राजकारणात सक्रिय होते. तेथे ते कोणत्याही पक्षात असले तरी कृपाशंकर सिंह यांच्या संपर्कात असत. तेथे यश मिळत नसल्याने ते उत्तरप्रदेशात गेले. तेथे त्यांनी बसपा, सपा असं राजकारण करत आमदारकी मिळवली.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित सुभाष पासी यांनी मंगळवारी पत्नी रीना पासीसह भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी त्यांना लखनौ येथील भाजप प्रदेश कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. एकेकाळी अखिलेश यादव यांच्या जवळचे असलेले सुभाष पासी यांना समाजवादी पक्षातून भाजपमध्ये आणण्यात कृपाशंकर सिंह यांचा मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

कृपाशंकर आणि निरहुआमुळे पासींचे जुळले भाजपाशी सूर…

  • मुंबईतील भाजपा नेते कृपाशंकर सिंह आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी पासी यांना भाजपात आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
  • सुभाष पासी हे भोजपुरी सिनेमाचे निर्मातेही आहेत. त्यामुळे निरहुआचे त्यांच्याशी जवळचं नातं आहे.
  • पासींचे कृपाशंकरांशीही जवळचं नातं आहे. दोघेही काँग्रेस पक्षात एकत्र होते.
  • त्यामुळे भाजपा प्रवेशानंतर आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी कृपाशंकरांना संधी पाहिजेच होती.
  • उत्तरप्रदेशातील संभाव्य अटीतटीच्या लढाईत एकेक मतदारसंघ महत्वाचा असल्याने त्यांनी पासींना फोडून स्वत:चं कौशल्य दाखवलं.
  • हे सारं सुरु असतानाचया सगळ्यामध्ये सपाने आपल्या ट्विटर हँडलवरून सुभाष पासी यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याची माहिती शेअर केली आहे.

 

मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा

  • सपाने पासी यांना २०१२ आणि २०१७ मध्ये सैदपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
  • ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
  • पासी हे सैदपूर मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडणूक जिंकत आहेत.
  • १९९६ नंतर भाजपाला या जागेवर आपला उमेदवार विजयी करण्यात अपयश आले आहे.
  • सैदपूरमध्ये सुमारे ३० ते ४० हजार असे मतदार आहेत जे पासी यांच्या समर्थनार्थ थेट मतदान करतील.
  • पासी कुठल्या पक्षात असोत.
  • त्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश आहे.
  • पासी यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्या भागातील लोकांना मदत केल्याचे सांगितले जाते.

 

पासी भाजपामध्ये आल्याने काही फरक पडणार नाही

  • सैदपूर विधानसभेत एससी-एसटी मतदारांची संख्या ७२ हजाराच्या जवळपास आहे.
  • त्याचबरोबर एकूण ८२ हजार ओबीसी मतदारांपैकी ६३ हजार मतदार फक्त यादव समाजाचे आहेत.
  • एससी राखीव जागा असूनही, या जागेच्या निवडणुकीत यादव मते निर्णायक भूमिका बजावतात.
  • या जागेवर यादवांची मते समाजवादी पक्षाकडे राहिल्याचे बोलले जात आहे.
  • गेल्या काही निवडणुकांमध्ये या जागेवर सपा आणि बसपा यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.
  • या आकडेवारीनुसार तर पासी यांच्या भाजप प्रवेशाचा या जागेवर फारसा परिणाम होणार नाही.
  • पासी भाजपमध्ये दाखल झाल्याने या जागेवर भाजपला प्रस्थापित चेहरा नक्कीच मिळेल.

Tags: BJPcm yogi adityanathkripashankar singhSubhash Pasiकृपाशंकर सिंहभाजपायोगी आदित्यनाथसपासुभाष पासी
Previous Post

“उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीसही नाही!”

Next Post

विद्यार्थ्यांच्या खात्यावर फेलोशिपची रक्कम बार्टीने त्वरित जमा करावी

Next Post
jaideep kawade

विद्यार्थ्यांच्या खात्यावर फेलोशिपची रक्कम बार्टीने त्वरित जमा करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!