Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामात पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

November 4, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
mtdc

मुक्तपीठ टीम

कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे जवळपास सर्वच पर्यटनस्थळे खुली झाल्याने पर्यटकांना दिलासा दिला आहे. हिवाळी पर्यटन हंगामासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे आरक्षण वाढू लागले आहे. गुलाबी थंडीची चाहूल आणि दीपावलीच्या सुटीचे वेध लागले असल्याने पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत. त्यामुळे महामंडळानेही विविध सोयी सुविधा आणि विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. विविध सोयी सुविधांसह पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज असल्याने पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या www.mtdc.co या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या नवीन संकेतस्थळावरून महामंडळाच्या पर्यटक निवासाचे आरक्षण करता येणार आहे. महामंडळाची नुतनीकरण झालेली पर्यटक निवासे आणि प्रशिक्षित कर्मचारी पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

 

एमटीडीसीमार्फत विविध घटकांना सवलती

महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्यांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच 1 ऑक्टोबरपासून ‘कॉम्लिमेंटरी ब्रेकफास्ट’ची सुरूवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.

 

कोरोना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

  • पर्यटक निवासात पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
  • उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
  • पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  • शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर अशी व्यवस्था पूर्वीपासूनच करण्यात आली आहे.
  • कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.
  • तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून ‘प्री-वेडींग फोटोशूट’ आणि ‘डेस्टीनेशन वेडींग’चीही सोय करण्यात येणार आहे.
  • काही रिसॉर्टवर वायफाय सुविधाही पुरविण्यात येत आहे.
  • त्यामुळे या पर्यटक निवासात राहून मुलांना ऑनलाईन क्लास तर पालकांना ऑनलाइन कामकाजही करता येणार आहे.

 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे, असे श्री. हरणे यांनी सांगितले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Maharashtra Tourismmtdcmuktpeethwww.mtdc.coआदित्य ठाकरेएमटीडीसीमहाराष्ट्र टूरिझममुक्तपीठ
Previous Post

स्थलांतरित पक्षांचा होणार पाहुणचार! जागतिक मोहिमेत भारताचा पुढाकार!

Next Post

जपानची न्यू कावासाकी व्हर्सिस १००० भारतात लाँच, साडे अकरा लाखाची दमदार स्पोर्ट्स टूर बाइक!

Next Post
Japan launches New Kawasaki Versys 1000

जपानची न्यू कावासाकी व्हर्सिस १००० भारतात लाँच, साडे अकरा लाखाची दमदार स्पोर्ट्स टूर बाइक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!