मुक्तपीठ टीम
आता ऋतू हिवाळ्याचा. सुट्ट्यांचा आनंद घेण्याचा. या येत्या काही दिवसांत अनेक सणही येणार आहेत. यानंतर हिवाळ्याच्या सुट्याही सुरू होतील. तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर, हा तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ ठरू शकतो. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही गुजरातला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता.
गुजरात हे असेच एक क्षेत्र आहे, जे नेहमीच मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. येथील संस्कृती, पाककृती आणि अनेक पर्यटन स्थळे नेहमीच लोकांना आकर्षित करत असतात. आयआरसीटीसीने गुजरातला भेट देण्याची योजना आखत असलेल्या लोकांसाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. या अंतर्गत तुम्ही अहमदाबाद, वडोदरा, द्वारका, राजकोट आणि सोमनाथ सारख्या ठिकाणांना भेट देण्याचा आनंद घेऊ शकता. आयआरसीटीसीने या टूर पॅकेजला VIBRANT GUJARAT WITH STATUE OF UNITY असे नाव दिले आहे.
आयआरसीटीसीद्वारे गुजरात टूर पॅकेजविषयीची सविस्तर माहिती
- गुवाहाटी विमानतळावरून प्रवास सुरू होईल.
- गुवाहाटी विमानतळावरून पर्यटक सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी वडोदरासाठी विमानाने जातील.
- वडोदरा विमानतळावर उतरल्यानंतर पर्यटक हॉटेलमध्ये विश्रांती घेतील.
- दुसऱ्या दिवशी नाश्ता करून पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी जातील.
- स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन घेतल्यानंतर प्रवासी वडोदरा येथे परततील.
- दुसऱ्या दिवशी प्रवासी सोमनाथला रवाना होतील.
- सोमनाथला पोहोचल्यानंतर प्रवासी सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी जातील.
- यानंतर, प्रवासी हॉटेलमध्ये परत जातील आणि तेथे आराम करतील.
- सोमनाथ येथून पर्यटक द्वारकेला जातील.
- द्वारकेत पर्यटक नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतील.
- द्वारका येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर अहमदाबादला रवाना होतील.
- अहमदाबादमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर, अक्षरधाम मंदिर आणि साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर प्रवासी विमानतळावरून गुवाहाटीकडे परत जातील.
- गुजरातच्या या ६ दिवस आणि ५ रात्रीच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला ३३,७०० रुपये खर्च करावे लागतील.