मुक्तपीठ टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. ही संपत्ती जवळपास १००० कोटींपेक्षा जास्त असल्याची माहीती आहे.
या संपत्तीवर जप्तीचे आदेश
- जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री- बाजार मूल्य: सुमारे ६०० कोटी
- साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट-बाजार मूल्य: सुमारे २० कोटी
- पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस-बाजार मूल्य: सुमारे २५ कोटी
- निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट-बाजार मूल्य: सुमारे २५० कोटी
- महाराष्ट्रात २७ वेगवेगळ्या ठिकाणी जमीन-बाजार मूल्य: सुमारे ५०० कोटी
किरीट सोमय्यांचे आरोप
- गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांचे कुटुंब आणि निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने घाडी घातल्या होत्या.
- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केली होती.
- बेनामी पद्धतीने संपत्ती गोळा करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
- मोहन पवार हे जरंडेश्वर कारखान्याचे एक मालक आहेत.
- पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली होती.
- अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार, मुलगा पार्थ अजित पवार, आई आशा अनंतराव पवार, बहीण विजया मोहन पाटील, जावई मोहन पाटील, बहीण नीता पाटील यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत.
- १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने, आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ.
- इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याचे ट्विटद्वारे माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती.
- त्यानंतर आता आयकर विभागाने ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.