मुक्तपीठ टीम
१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असेलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडीच्या कार्यालयात हजर राहिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गायब असलेले अनिल देशमुख सोमवारी सकाळी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यापूर्वी त्यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडली आहे. तसेच आरोप करणारे परमबीर सिंह कुठे आहेत असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सिंग देश सोडून पळू गेले…
- अनिल देशमुखांनी दोन व्हिडीओ पोस्ट करून आपलं म्हणणं मांडलं आहे.
- मी सरळमार्गाने चालणारा आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे.
- ३० वर्षात माझ्यावर एकही आरोप झाला नाही.
- राजकीय आणि सामाजिक जीवनात एकदाही आरोप झाला नाही.
- पण आज सिंह देश सोडून पळू गेले, वाझे तुरुंगात आहेत, या लोकांनीच माझ्यावर केलेल्या आरोपाची ईडी आणि सीबीआय चौकशी करत आहे.
- याचं मला अतिशय दु:ख आहे.
मा. उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशी साठी संपुर्ण सहकार्य करणार आहे. pic.twitter.com/c7OZ2MY1zS
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 1, 2021
परमबीर सिंग आणि वाझेंच्या आरोपावर माझी चौकशी
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा सहकारी सचिन वाझेनेही सिंह यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले.
- आज सचिन वाझे हे खुनाच्या आरोपावरून आतमध्ये आहेत.
- सचिन वाझे यापूर्वी सुद्धा अनेकदा तुरुंगात होते. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेंना नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
- त्यांना नोकरीतून काढल्यावर त्यांनी माझ्यावर आरोप केले.
- परमबीर सिंह आणि वाझेंच्या आरोपावर माझी चौकशी होत आहे.
- माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे.
- त्याचं मला दु:ख होत आहे, असंही ते म्हणाले.
परमबीर सिंग आज कुठे आहेत?
- देशमुख यांनी यावेळी थेट परमबीर सिंह यांच्या गायब होण्यावरच सवाल केला आहे.
- परमबीर सिंगांनी माझ्यावर खोटे आरोप केले ते सिंह आज कुठे आहेत?
- सिंग भारत सोडून परदेशात पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत.
- ज्याने आमच्यावर आरोप केला तोच पळून गेला.
- आज सिंग यांच्या विरोधात त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या.
- अनेक व्यावसायिकांनीही तक्रारी केल्या आहेत.
- अशा माणसाच्या तक्रारीवरून माझी चौकशी होत आहे, याचं दु:ख आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दोनदा मी त्यांच्या कार्यालायत जाऊन स्टेटमेटं दिलं
- मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जात आहे.
- चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे.
- मला जेव्हा ईडीचा समन्स आला.
- तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
- मला जेव्हा जेव्हा समन्स आला तेव्हा मी ईडीला माझी याचिका कोर्टात आहे.
- त्याची सुनावणी सुरू आहे असं सांगतानाच मी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली आहे.
- त्याचा निकाल आल्यावर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईल असं सांगितलं होतं.
- आमच्या सर्व घरावर छापे मारले.
- आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं.
- सीबीआयने दोनदा समन्स दिलं.
- दोनदा मी त्यांच्या कार्यालायत जाऊन स्टेटमेटं दिलं आहे.