मुक्तपीठ टीम
रिलायन्स जियोच्या नवीन स्मार्टफोनची वाट पाहत असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जियो आणि गुगलने आज घोषणा केली आहे की, जियो फोन नेक्स्ट स्मार्टफोन दिवाळीपासून स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. जियो कंपनीचा दावा आहे की, जियो फोन नेक्स्ट हा जगातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल. जियो चा नवीन स्मार्टफोन १,९९९ रुपयांच्या स्टार्टिंग किंमतीवर उपलब्ध असेल. उर्वरित रक्कम ग्राहकांना १८/२४ महिन्यांत सुलभ ईएमआयमध्ये भरावी लागेल. जर हा पर्याय नको असेल तर जियो फोन नेक्स्ट ६४९९ रुपयांना खरेदी करू शकता.
या सेगमेंटमध्ये प्रथमच असा अनोखा फाइनेंसिग ऑप्शन सादर केला जात आहे. ज्यामुळे हा फोन अधिकाधिक ग्राहकांना उपलब्ध होईल. अद्वितीय वैशिष्ट्याने युक्त जियो फोन नेक्स्ट रिलायन्स रिटेलच्या देशभरातील जियोमार्ट डिजिटल रिटेल स्थानांच्या विस्तृत नेटवर्कवर उपलब्ध असेल. व्हॉट्सअॅपद्वारेही फोन बुक करता येईल.
यासाठीच्या २ सोप्या स्टेप्स
- जवळच्या जियो मार्ट डिजिटल रिटेलरला भेट द्या किंवा www.jio.com/next ला भेट द्या किंवा WhatsApp वर – 70182-70182 वर ‘Hi’ पाठवा.
- कन्फॉर्मेशन मिळाल्यावर, तुमच्या जवळच्या जियोमार्ट रिटेलरला भेट देऊन तुमचे डिव्हाइस गोळा करा.
जियो फोन नेक्स्टचे फिचर्स
- जियो फोन नेक्स्ट मध्ये ५.४५-इंच मल्टीटच HD + (७२०X१४४०) पिक्सेल रिझोल्यूशन डिस्प्ले मिळेल.
- डिस्प्लेची खासियत म्हणजे याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे संरक्षण तसेच अँटीफिंगरप्रिंट कोटिंग मिळेल. • ज्यामुळे फोनवर फिंगरप्रिंट्स राहणार नाहीत.
- फोन QM-२१५, १.३ Ghz पर्यंत क्वाड कोर प्रोसेसरद्वारे काम करेल.
- २GB RAM आणि ३२GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध असेल.
- स्टोरेज ५१२ GB पर्यंत वाढवता येणे शक्य आहे.
- फोटोग्राफीसाठी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल, तर १३-मेगापिक्सेलचा एक कॅमेरा बॅक पॅनलवर उपलब्ध असेल.
- फोनमध्ये ३५००mAh बॅटरी आहे.
- कनेक्टिव्हिटीसाठी फोनला वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक मिळेल.
- फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील उपलब्ध असतील.