मुक्तपीठ टीम
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यामधील दानापूर गावातील सवर्णांकडून अनुसुचित जातीच्या बांधवांवर वारंवार अन्याय आत्याचर होत असून त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच सवर्णांनी बंद केल्याचा कुप्रकार केला. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन अनुसूचित जातीच्या बांधवांना जातीवाचक शिवीगाळ करण्याचा गलिच्छ प्रकार तेथील समाज कंटकाकडून केल्या गेले. या प्रकरणी जरी पोलिसांनी चौघांवर अॅट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल केलेत. मात्र, स्थानिक एसडीपीओंनी सदर प्रकरणच दाबण्याचे कारस्थान करण्यात येत आहे, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला. त्या जातीयवादी लोकांनी बौद्ध बांधवांना जातीयवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व गावा बाहेर सुद्धा काढले.
- या प्रकरणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेउन दोषींवर कठोर कारवाई करण्यासह संपूर्ण गावातील सुवर्ण समाजावर अट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.
- पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, एसडीपीओंचे पाठबळ असल्यानेच सवर्णाचे मनोबल वाढले आणि त्यांनी तेथील अनुसूचित जमाती मधील युवतींना आणि भगिनींना त्रास देणे सुरू केले. याबाबत गुन्हे दाखल झालेत. मात्र दोन्ही प्रकरणात मात्र कार्यवाही नाममात्र करण्यात आली.
- जेव्हा या अन्यायाविरूध्द दानापूरचे दहा दलित गावात आमरण उपोषणला बसले होते. त्यानंतर चांदूरच्या एसडीपीओद्वारे गुन्हे दाखल केले परंतु आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचा आरोपही जयदीप कवाडे यांनी केला.
आरोपींना शासन-प्रशासनाकडून पाठबळ
वहीवाटीच्या रस्त्यासाठी स्थानिक तहसीलदाराकडे २३/०७/२१ दाखल केसवर चार महिणे होऊनही निकाल लागलेला नाही. सततचा अन्याय, अत्याचार होऊनही न्याय मिळत नसल्याने दानापूरचे अनुसूचित जातीचे बांधव व्यथीत झाले आहे. तर आरोपींना शासन-प्रशासनाकडून पाठबळ मिळाल्याने त्यांचे अन्याय अत्याचार वाढल्या गेले. अनुसूचित जातीचे बांधव तहसिलमध्ये वारंवार जाऊनही त्यांना न्याय मिळाला नाही. अशातच गेल्या १८ ऑक्टोबरला दानापूरच्या त्या कथीत सर्वणांनी निखिल चांदणे यांच्या शेतातील सोयाबीन जाळले. यातील संशईताची नावे देऊनही पोलिसांकडून ठोस कार्यवाही का केली गेली नाही. या प्रकरणाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेउन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जयदीप कवाडे यांनी केली.