मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सरकार आणि नोकरशाहीवर सडेतोड भाष्य केले आहे. गडकरी म्हणाले की, “सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अहंकार आहे. त्यांना वाटतं की, सर्व माहिती माझ्याकडे आहे, म्हणून ते लोकांचा सल्ला घेत नाहीत. चांगल्या माणसांनी नेहमीच निंदा करणाऱ्या व्यक्तीला सोबत ठेवावे.” असे ते म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वैयक्तिक सल्लामसलत अॅप ‘कन्सल्ट’ च्या लॉन्चिंगच्या वेळी गडकरींनी या गोष्टी सुनावल्या. त्यांनी हे नेमकं सरकारं म्हणत नेमकं कुणा-कुणाला सुनावलं, अशी चर्चा सुरु झाली आहे.
वेळेवर निर्णय न घेतल्याने प्रकल्पाला विलंब
- गडकरी पुढे म्हणाले की, वेळेवर निर्णय न घेतल्याने सरकारी प्रकल्पांना विलंब होतो.
- ते म्हणाले की, समस्या ही नाही की निर्णय घेतात, समस्या ही आहे की ते निर्णय घेत नाहीत.
- येथे सहसचिवांची चूक सचिव हाताळतात, सचिवाची चूक मंत्री हाताळतात. पण मी जबाबदारी निश्चित करण्यावर विश्वास ठेवतो.
जास्त मोबदल्यामुळे आंदोलने नाहीत!
- सर्व राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्गांचे प्रकल्प सुरू आहेत.
- जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर कुठेही आंदोलने होत नाहीत.
- आता जमीन अधिग्रहणासाठी जास्त पैसे दिले जातात.
- यामुळे लोक आता माझी जमीन घेऊ नका म्हणायला येत नाहीत.
- माझीही जमीन घ्या असं म्हणायला आता लोक येतात.
कन्सल्ट अॅपविषयीची महत्त्वाची माहिती
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कन्सल्ट अॅप लाँच केले.
या अॅपची निर्मीती माजी आयएएस अधिकारी राघव चंद्र यांनी केले आहे. - देशातील ६५ विभागातील ३८० तज्ञ या अॅपशी जोडलेले आहेत.
- नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
- आगामी काळात नीती आयोगही या अॅपची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अॅपवर प्रत्येक समस्येशी संबंधित तज्ञ सापडतील.
- अॅपच्या माध्यमातून आरोग्य, सुरक्षा, कृषी, पर्यावरण, परराष्ट्र व्यवहार, काश्मीर प्रकरण, रेल्वे, आर्थिक, महिला सक्षमीकरण, धर्म आणि अध्यात्म यासह ६५ विषयांवरील तज्ज्ञांकडून थेट माहिती घेतली जाऊ शकते.
- अॅपवर बोलल्यावर पहिला १ मिनिट विनामूल्य असेल आणि त्यानंतर काही शुल्क भरावे लागेल जे तज्ञांच्या खात्यात जाईल.