मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच त्यांना अधिकृत फरार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. गृह विभागाने परमबीर यांना शोधण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोचीही मदत मागितली आहे. असं मिळालेल्या माहितीद्वारे स्पष्ट झाले आहे.
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परमबीर या वर्षी मे महिन्यात बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली होती. यासोबतच मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलियाजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणीही त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग अँटिलिया प्रकरणानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप करून चर्चेत आले होते.
बिल्डर अग्रवालांच्या तक्रारीनंतर एसआयटी
बिल्डर राधेश्याम अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर पाच पोलीस अधिकाऱ्यांवर १५ कोटी रुपये वसूल करण्याचा गुन्हा मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या गुन्ह्यानंतरच भ्रष्टाचार केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या गृहविभागाने एसआयटीची स्थापना करण्यात आली.
एसआयटीत खालील सदस्यांचा समावेश
- नितीन गोयल (पोलीस आयुक्त)
- एमएम मुजावर (सहाय्यक पोलीस आयुक्त)
- प्रिणम परब (पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)
- सचिन पुराणिक (पोलीस निरीक्षक)
- विनय घोरपडे (पोलीस निरीक्षक)
- महेंद्र पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)
- विशाल गायकवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पश्चिम विभाग, सायबर पोलीस ठाणे)
या प्रकरणी तपासणी घेण्यापूर्वी आरोपी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये डीसीपी अकबर पठान, डीसीपी पराग मनेरे, एसीपी संजय पाटील, एसीपी श्रीकांत शिंदे, पोलीस निरीक्षक आशा कोंकरे यांचा समावेश आहे.
अग्रवाल यांचे आरोप गंभीर
- परमबीर सिंह यांनी बनावट गुन्हा दाखल करत १५ कोटींची मागणी केली.
- पैसे दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले.
- २०१६पासून पैशांची मागणी करत असल्याचे अग्रवालने सांगितले.
- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य पाच जणांवर आयपीसीच्या कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120 (बी), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111, 113 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- या संदर्भात बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पौर्णिमा या दोन भागीदारांना अटक करण्यात आली आहे.