Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बालविवाह झालेल्या मुलीचा बाळंतपणात मृत्यू : रुपालीताई चाकणकर पहिली भेट या गावाला द्या

October 24, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
herambhaa kulkari and ruplai chakhankar

हेरंबकुलकर्णी / व्हा अभिव्यक्त!

कोरोना काळात महाराष्ट्रात बालविवाह वाढले याबाबत आम्ही कार्यकर्ते ओरडून थकलो पण सरकारने पावले उचलली नाहीत व आज कोरोना काळात बाल विवाह झालेल्या मुलीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. बालविवाह विरोधी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल Satyabhama Saundarmal यांनी मला उस्मानाबाद जिल्ह्यात अशी घटना घडल्याची माहिती कळवली. उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून ती दडपलेली घटना शोधण्याचा प्रयत्न केला,गावापर्यंत माहिती घेतली.अनेकांशी बोललो तेव्हा दुर्दैवाने ती घटना खरी आहे.माहिती अशी आहे.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदुर येथे शेतात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील मुलगी तिचे वडील इतरांची गुरे राखण्याचे काम करतात. त्या मुलीचा मागील वर्षी बालविवाह लावण्यात आला. तिचे लग्न उस्मानाबाद तालुक्यातील उतमी कायापुर परिसरातल्या एका तरुणाशी लावण्यात आले. अल्पवयीन मुलगी असल्याने किमान तिच्यावर बाळांतपण लादू नये इतकाही विवेक त्या तरुणाला राहिला नाही व ती गरोदर राहून १४ ऑक्टोबरला तिला त्रास व्हायला लागला. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले व तिचा बाळंतपणा दरम्यान मृत्यू झाला. बाळ मात्र सुखरूप आहे.बाल विवाहामुळे कुपोषण बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण वाढते हे पुस्तकी वाक्य प्रत्यक्ष समोर बघताना अत्यंत वेदना होतात.. स्त्री सक्षमीकरण वगैरे शब्द फोल वाटायला लागतात. १५ ऑक्टोबर ला मृत्यू झाला. आज ९ दिवस झाले तरी गुन्हा का दाखल झाला नाही ? याचीच चौकशी करायला हवी.

 

लॉकडाऊन च्या काळात प्रशासनाने बालविवाह थांबवले नाहीत त्याचा हा समोर आलेला परिणाम अस्वस्थ करतो. कदाचित इतरही अनेक मुलींचे मृत्यू होत असतील तर ते पोहोचत नाहीत. बाल विवाहामध्ये मुलगी बाळंतपण सहन करू शकत नाही. तिच्या शरीरावर, मनावर अत्यंत विपरीत परिणाम होतात. अनेकदा बालमृत्यू, मातामृत्यू होतात. हे कटू सत्य या घटनेने अधोरेखित केले आहे.

 

अजूनही या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले म्हणून थेट बलात्काराचा गुन्हा दाखल करायला हवा व त्या बिचाऱ्या मुलीच्या मृत्यू बद्दल सासरचे व माहेरचे यांना जबाबदार धरून आरोपी करायला हवे. दयामाया न दाखवता कठोरपणे कारवाई व्हायला हवी तरच या कायद्याचा वचक बसू शकेल.. उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व मीडिया व सामाजिक कार्यकर्त्या महिला कार्यकर्त्यांनी या प्रकरणात लक्ष घालायला हवे . तिचे बाळ आज उघड्यावर पडले आहे.

 

  • बलात्काराच्या घटनांची चवीने चर्चा करणाऱ्या समाजाने बाल विवाहामध्ये सर्रास मुलींवर रोज होणाऱ्या बलात्कारांची दखल आता घ्यायला हवी.
  • बालविवाह हा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याचा परवाना ठरतो आहे व मातामृत्यू आणि बालमृत्यूचे ते कारण ठरते आहे हे या घटनेने दाखवून दिले आहे.
  • महिला आयोगाच्या नूतन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आता सर्वप्रथम पहिली भेट उस्मानाबाद जिल्ह्यातील या गावाला दिली पाहिजे.महिला आयोगाचा बालविवाह रोखणे हा अजेंडा व्हायला हवा व ते ह्या घटनेपासून व्हायला हवे
  • उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजाभवानीच्या शक्तीचा गौरव केला जातो त्याच जिल्ह्यातील अभागी भगिनी नवरात्र सुरू असतानाच मृत्युमुखी पडली आहे ही वेदना अस्वस्थ करते

 

लिंक क्लिक करा आणि वाचा: 

सोशल मीडियाची सुपर पॉवर! जन्माआधीच वडिलांना गमावलेल्या गौरीला दीड लाखांची मदत!

 

 


Tags: coronaHerambh kulkarnirupali chakhankarSatyabhama SaundarmalUsmanabadउस्मानाबादकोरोनारुपालीताई चाकणकरसत्यभामा सौंदरमलहेरंबकुलकर्णी
Previous Post

घरचा पीसी, लॅपटॉप स्लो झाला? फास्ट करण्यासाठी या घ्या सोप्या टीप्स…

Next Post

नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात ७७ जागांसाठी भरती

Next Post
nmc

नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात ७७ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!