मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता मला पश्चाताप होतोय, असं खळबळजनक वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शेट्टींच्या या वक्तव्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. लवकरच आघाडी सोडण्याबद्दल निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीसोबत गेल्याचा पश्चाताप होतोय
- महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता मला पश्चाताप होतोय.
- ऊस उत्पादक शेतकरी लांब गेले तर राष्ट्रवादीचं काय होईल याचा विचार करा.
- महाविकास आघाडीनं घरगुती वीज ग्राहकांना फसवलं, पूरग्रस्त, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवलं.
- सरकारमध्ये राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल.
- त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं का, याचा निर्णय लवकरच घेऊ.
- आता कुणाला भेटायला जायची गरज नाही.
तर तो कारखाना आम्ही बंद पाडू
- किरीट सोमय्या करत असलेले आरोप आणि तक्रार मी सहा वर्षांपूर्वीच ईडीकडे केली होती.
- मात्र, त्यावेळी ईडी येडी झाली होती.
- आता शहाणी झाली.
- याचा केंद्राला फायदा होईल हे आता ईडीला कळलं आहे.
- आता सुरु असलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत करु, पण हे सगळे कारखाने शेतकऱ्यांच्या ताब्यात जातील हे जाहीर करा.
- गेल्या हंगामाची एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका.
- दिला तर तो कारखाना आम्ही बंद पाडू.
११ टक्के महागाई भत्ता दिला
- गेली १९ वर्षे याच मैदानात ऊस परिषदा घेतल्या आणि दर मागून घेतला.
- पहिल्या ऊस परिषदेला माझ्या डोक्यावर बँडेज आणि दाढी काळी होती.
- आता दाढी पांढरी झाली तरी प्रश्न तेच आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आपण आणलं.
- पावसात भिजत-भिजत हे सरकार आलं.
- यांना महापुराची जाण असेल असं वाटलं होतं.
- मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, मी फसवणार नाही.
- सरकारनं काय मदत केली हे गेल्या काही दिवसांत तुम्ही पाहिलंच असेल.
- मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरही अतिवृष्टीचं संकट आलं.
- पैसे नाही म्हणालात आणि ११ टक्के महागाई भत्ता दिला.
- यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका
- दसरा गोड झाला नाही तर दिवाळीला शिमगा करु असं मी सांगितलं होतं.
- आता दिवाळीला गावात येणाऱ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करा.
- यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे.
- शरद पवारांना फक्त पावसातील भाषणाची आठवण करुन देतो.
- साखरेला चांगले भाव आले असताना एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलं जात आहे.