मुक्तपीठ टीम
२० वर्षांनंतर पुन्हा एकदा नोकिया आपले जुने मॉडेल ६३१० बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा फोन त्याच्या मजबूत बिल्ड आणि पावरफूल बैटरीमुळे लोकांची पसंती बनला होता, आता पुन्हा आधुनिक स्वरुपात त्याच वैशिष्ट्यांसह तो फोन परततोय.
नोकिया ६३१० चे फीचर्स
- नोकियाच्या नवीन मॉडेलमध्ये २.८ इंचाचा डिस्प्ले असेल.
- तो UNISOC 6531F प्रोसेसरला सपोर्ट करते.
- यात ८MB रॅम आणि १६MB स्टोरेज आहे.
- फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह मागील बाजूस ०.३ मेगापिक्सलचा सिंगर कॅमेरा आहे.
- मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे.
- नोकिया ६३१० मध्ये ब्लूटूथ ५.०, वाय-फाय, ड्युअल सिम सपोर्ट आणि एफएम रेडिओ आहे.
- युजर्स ३२ GB पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात.
नोकिया ६३१० ची बॅटरी पॅावर
- फोनमध्ये 1150mAh ची बॅटरी आहे.
- कंपनीचा दावा आहे की ती 7 तासांपेक्षा जास्त वेळ टॉक टाइम देईल.
- तर स्टँडबाय मोडमध्ये एक आठवडा टिकेल.
- बॅटरी काढण्यायोग्य आहे.
- फोन कंपार्टमेंटसह चार्जर आणि मायक्रो यूएसबी केबल देखील उपलब्ध आहे.
नोकिया ६३१० ची किंमत
- नोकिया ६३१० ची किंमत फक्त ६१८७ रुपये आहे.
- हा फोन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल.
नोकियाची कथा…
एक काळ होता जेव्हा नोकिया जगातील सर्वात मोठी मोबाईल फोन उत्पादक कंपनी होती. भारतासारख्या देशांमध्ये तर मोबाइल फोन म्हटले की नोकियाच आठवयाची. नोकियाचे अस्तित्व मोबाइल फोन बाजारातील जवळजवळ सर्व विभाग आणि प्रोटोकॉल, सीडीएमए बाजारात प्रभावीरीत्या होते. ही कंपनी (सीडीएमए), जीएसएम (GSM) आणि W-CDMA. (W-CDMA), आणि त्याची उत्पादने तयार करत असे. नोकियाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नोकियाचे हार्डवेअर इतर सर्व मोबाईल फोनपेक्षा मजबूत मानले जात असे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फिनिक्स रबर वर्क्सने प्रथम नोकिया ब्रँडचा वापर केला. नोकियाने १९६० च्या दशकापासून व्यावसायिक आणि लष्करी मोबाईल रेडिओ कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचे उत्पादन सुरू केले. सलोरासह नोकियाने१९७१मध्ये फोन तयार केला. नोकिया त्यानंतर अनेक वर्षे जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादक कंपनी होती, परंतु पुढे अँड्राइड स्मार्टफोनचा काळ आला. टचस्क्रिन आणि बहुउपयोगी, यूजर फ्रेंडली डिव्हाइसच्या काळात नोकिया मागे पडत गेली.
काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नोकियाकडे ताब्यात घेतले. मोबाइल उत्पादनाकडे लक्ष दिले. मात्र काही होऊ शकले नाही. नोकियाच्या टीमने पुन्हा मोबाइल उत्पादनाचे काम नव्याने स्वतंत्ररीत्या सुरु केले आहे. आता पुन्हा जुने स्थान मिळवण्याच्याआधी किमान प्रभावी अस्तित्व मिळवण्याच्या प्रयत्नातच पूर्वी गाजलेले फोन नव्या स्वरुपात लाँच करण्याचा प्रयत्न दिसत आहे.
पाहा व्हिडीओ: