मुक्तपीठ टीम
मुंबईत शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक झाल्यामुळे गाजलेल्या क्रूज ड्रग्स प्रकरणाचे कनेक्शन बिहारशी असल्याचे उघड झाले आहे. मुंबई एनसीबीने अटक केलेल्या आठ आरोपींपैकी एक हा बिहारच्या मोतीहारी मध्यवर्ती कारागृहात जेरबंद असलेल्या अंमली पदार्थ तस्कर विजय वंशी प्रसादचा नातेवाईक आहे.
विजय हा मुंबईतील मालाड पूर्वमधील कुरार गावात राहत असे. तेथेच राहणारा मोहम्मद उस्मान शेख त्याचा साथीदार आहे. उस्मान शेखही सध्या मोतीहारी मध्यवर्ती कारागृहातही आहे. दोन्ही अंमली पदार्थ तस्करांना मुंबई एनसीबीची टीम चौकशीसाठी सात दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर घेत आहे. त्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
एनसीबीची टीम आणि कांदिवली पश्चिम पोलीस स्टेशन मोतिहारीमध्ये तळ ठोकून आहेत. विजय आणि उस्मान यांच्याविरोधात मोतिहारीच्या चकिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचे IO चकिया पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कुमार यांनी दुजोरा दिला आहे.
मुंबईतील ड्रग्स पार्टीचे बिहार कनेक्शन
- मुंबई ते गोवा फेऱ्या मारणाऱ्या क्रूझवर ड्रग्स पार्टी झाली होती.
- त्या पार्टीवर धाड घालत एनसीबीने आर्यन शाहरुख खानसह आठजणांना अटक केली होती.
- एनसीबीच्या चौकशीत एका आरोपीने बिहारच्या मोतीहारी सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या ड्रग स्मगलर विजय वंशी प्रसादचा नातेवाईक असल्याची माहिती दिली आहे.
- विजय त्याच्या सहकाऱ्यांसह बिहारमधील मोतिहारी सेंट्रल जेलमध्ये आहे.
- ती माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने मोतिहारी पोलीस आणि तुरुंग प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्याची चौकशी केली.
- न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, उस्मान आणि विजय यांना ट्रांझिट रिमांडवर मुंबई एनसीबीच्या ताब्यात देण्यात येईल.
ड्रग्स माफियांचे जाळे नेपाळ ते मुंबई वाया मुंबई
- शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत क्रूझवर पकडलेल्या आरोपीनी महत्वीची माहिती दिली आहे.
- ड्रग्स माफियांचे संबंध नेपाळ आणि उत्तर बिहारमधील मुजफ्फरपूरच्या अनेक तस्करांशी जोडले जात आहे.
- मुजफ्फरपूर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या नेपाळमधील तीन आणि मुजफ्फरपूरच्या कटरा पहसौलमधील तीन तस्करांविषयी एनसीबीकडून माहिती घेण्यात आली आहे.
- त्यांचा गुन्हेगारी कारवायांचा रेकॉर्डही जमवला जात आहे.
- महाराष्ट्रातील मालाड पश्चिम येथील दीपक उर्फ टार्जन ऊर्फ बाबा या ड्रग्स सिंडिकेटचा किंगपिन असल्याचे सांगितले जाते.
- नेपाळच्या उस्मान, विजय, प्रकाश, सात्विक, संजय आणि गौरव कुमार, मुझफ्फरपूरच्या कटरा पहसोलचा बन्सो कुमार आणि रुपेश शर्मा हे दीपकसाठी काम करतात.
- नेपाळहून ड्रग्स घेत ते बिहारमार्गे रस्त्याने मुंबईत पुरवले जात असे.