मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्य ध्वजाचं प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर भुईकोट शिवपट्टण किल्ल्यावर भारतातील सर्वात मोठ्या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना केली गेली.
काय म्हणाले रोहित पवार
- दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून हा झेंडा कोणा एकाचा नसून सर्वांचा, यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.
- सर्वांना एकतेचा संदेश द्यायचाय असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलंय.
या झेंड्याखाली सर्व एकत्र येणार असून याच्या पुढे कोणी लहान मोठा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
खर्डा येथील ऐतिहासिक शिवपट्टण किल्यासमोर आज विजयादशमी निमित्त आ. @RRPSpeaks यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात उंच (74 मिटरचा) #स्वराज्य_ध्वज उभारण्यात आला. या सोहळ्याला उपस्थित राहून आमदार रोहितदादांचा सत्कार केला. pic.twitter.com/iHi2X6PrB8
— Vijaysinh Pandit (@VijaysinhPandit) October 15, 2021
भारतातील सर्वात मोठा भगवा ध्वज
- हा ७४ मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहेय.
- तर या ध्वजाचा आकार ९६x६४ फूट असून वजन ९० किलो आहे.
- तसेच, देशातील ७४ इतिहास आणि धार्मिक ठिकाणी या ध्वजाचे पूजन झाले असून ३६ जिल्हे आणि ६ राज्यांमधून १२ हजार किलोमीटर असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास करून आज खर्डा येथे प्रतिष्ठापना त्याची प्रतिष्ठापना झाली आहे.
भारतातील सर्वांत उंच भगव्या स्वराज्य ध्वजाचा प्रतिष्ठापना सोहळा LIVE !#स्वराज्य_ध्वजhttps://t.co/tY9h9Fxw6y pic.twitter.com/pPbY6V1oCQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 15, 2021