मुक्तपीठ टीम
अनेकांची परदेश दौऱ्यावर जाण्याची इच्छा असते, पण टूर पॅकेजेचे दर जास्त असल्यामुळे ते शक्य नाही. भारताच्या शेजारी असे अनेक देश आहेत, जे अगदी खिशाला परवडणारे आहेत. त्यामुळे तुम्ही मस्त तिथे फिरू शकता. हिंदी महासागरात वसलेला हा देश पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षक राहिला आहे. जर तुम्ही खूप कमी बजेटमध्ये मालदीवला भेट देऊ इच्छित असाल तर IRCTC तुमच्यासाठी खूप छान पॅकेज देत आहे. IRCTC ने या मालदीव पॅकेजला ‘जादुई मालदीव’ असे नाव दिले आहे. मालदीव हा बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.
जाणून घेऊया कसा असेल प्रवास
- अशा प्रकारे असेल ४ रात्री आणि ५ दिवसांच्या हा टूर पॅकेज आहे.
- पहिल्या दिवशी पर्यटकांना मालदीवच्या माले आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हॉटेलमध्ये नेले जाईल.
- दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासी हॉटेलच्या इनडोअर आणि आउटडोअर अॅक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात.
- त्यानंतर पर्यटक पाणबुडी क्रूझवर व्हेल किंवा डॉल्फिन पाहण्यासाठी स्वखर्चानी जाऊ शकतात.
- पर्यटक पाण्याखाली असलेल्या आलिशान हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणासाठीही जाऊ शकतात.
- पर्यटक दौऱ्याच्या चौथ्या दिवशी त्यांच्या गंतव्यस्थानाकडे परत येतील.
- तुम्हाला ४९,६६०रुपये भरावे लागतील.
- राहण्यासाठी, डिलक्स श्रेणीतील हॉटेल्सची व्यवस्था असेल.