Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग वांद्रे पश्चिम येथे रंगणार

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची संकल्पना

October 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish Shelar

मुक्तपीठ टीम

ज्या  मराठी माणसाचे आणि नाटकाचे अतूट नाते आहे त्या नाट्यरसिक आणि रंगदेवतेची राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक महिने ताटातूट झाली. आता मोठ्या संघर्षानंतर २२ ऑक्टोबरपासून रंगभूमीचा पडदा उघडणार असल्याच्या निमित्ताने वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे त्याचा आनंद साजरा करीत मराठी नाटकाचा पहिला प्रयोग समारंभपूर्वक रंगणार आहे.

 

अनलाँक २ सुरू होऊन अनेक क्षेत्रांना मुभा देण्यात आली तरी नाट्यगृहाचा पडदा मात्र उघडण्यास ठाकरे सरकारने मज्जाव केला होता. त्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली. त्यांनी सरकार विरोधात आंदोलन केले तीथेही सरकारने त्यांची उपेक्षाच केली. या मराठी कालावंताच्या लढ्यात सहभागी होऊन त्यांच्या संघर्षाला पाठबळ देणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी समारंभपुर्वक नाटकाला आता सुरुवात करायचे ठरवले आहे.

२२ आक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे या निमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांच्या गाजलेल्या “एका लग्नाची पुढची गोष्ट” या नाटकाचा एक खास प्रयोग ठेवण्यात आला आहे. यावेळी शासनाच्या नियमितपणे ५० टक्के क्षमतेनेच विनामूल्य प्रवेश रसिकांना देण्यात येणार असून रेड कार्पेट अंथरूण व गुलाबाचे फुल देऊन नाट्य रसिकांचे स्वागत करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी काही मराठी कलावंताना पण खास आमंत्रित करण्यात येणार आहे.

 

तसेच गेल्या पावणेदोन वर्षात मराठी रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलावंत, तंत्रज्ञ यांची ससेहोलपट झाली. त्यांना अनेक संस्था आणि व्यक्तींनी  त्यांना मदत केली. यामध्ये अभिनेते प्रशांत दामले, अशोक हांडे यांच्यासह काही सामाजिक संस्थांचा सहभाग होता. यातील काही व्यक्ती आणि संस्थांचा प्रतिनिधीक सत्कार ही यावेळी करण्यात येणार आहे.


Tags: adv. ashish shelarashok handeBJPprashant damlerangshardaअँड आशिष शेलारअशोक हांडेप्रशांत दामलेभाजपारंगशारदा
Previous Post

आयकर खात्याची धाड…१४२ कोटीची रोकड जप्त! कार्यालय औषध कंपनीचं!!

Next Post

स्वबळावर लढून भाजपा परभणी जिल्ह्यात विजयाची परंपरा निर्माण करेल

Next Post
Chandrakant Patil

स्वबळावर लढून भाजपा परभणी जिल्ह्यात विजयाची परंपरा निर्माण करेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!