Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वबळावर लढून भाजपा परभणी जिल्ह्यात विजयाची परंपरा निर्माण करेल

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

October 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
Chandrakant Patil

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल. भाजपा आता राज्यात सर्वच निवडणुका एकट्याने लढवेल आणि कोणासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घेणार नाही, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर यांनी आपल्या समर्थक नेत्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपा मराठवाडा संघटनमंत्री संजय कोडगे, माजी आमदार मोहन फड, भाजपा परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे उपस्थित होते.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्यात भाजपाचे संघटनात्मक कार्य चांगले असले तरी निवडणुकात युतीमुळे वसेशिनेला संधी मिळाली आणि जिल्ह्यातील निवडणुकीच्या राजकारणात भाजपा कमकुवत राहिली. आता भाजपा परभणीमध्ये स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार असून पक्ष निवडणुकीच्या राजकारणातही प्रभावी ठरेल आणि विजयाची परंपरा निर्माण करेल. आता महाराष्ट्रात भाजपा एकट्याने निवडणुका लढवेल. एखाद्या पक्षासोबत निवडणूक लढवून फसवणूक करून घ्यायची नाही.

 

त्यांनी सांगितले की, यापुढे केवळ भारतीय जनता पार्टीलाच राजकीय भवितव्य आहे. एकेका नेत्यांच्या मालकीच्या पक्षांमध्ये भविष्यात काय होणार असा प्रश्न आहे. तथापि, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि त्याचे काम चालूच राहणार आहे. ते म्हणाले की, भाजपामध्ये प्रवेश केलेल्या परभणी जिल्ह्यातील नेत्यांना आपण आश्वस्त करतो की, त्यांचा सन्मान पक्षामध्ये राखला जाईल. विजय वरपूडकर म्हणाले की, परभणी जिल्ह्यात भाजपा बळकट करण्यासाठी आपण काम करू. जिल्ह्यात भाजपासाठी कार्यकर्ते जोडण्याचे काम आपल्याला करायचे आहे.


Tags: BJPchandrakant patilShivsenaVijay Varpudkarचंद्रकांत पाटीलभाजपाविजय वरपूडकरशिनसेना
Previous Post

रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग वांद्रे पश्चिम येथे रंगणार

Next Post

‘आजही मुख्यमंत्री’ विधानावरून फडणवीसांना पवारांचा टोला

Next Post
BJP-NCP

'आजही मुख्यमंत्री' विधानावरून फडणवीसांना पवारांचा टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!