Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आदिवासीबहुल भागाच्या जलद विकासासाठी वीज, जलसंधारणाची कामे त्वरीत पूर्ण करावी”

कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

October 13, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
dadaji bhuse

मुक्तपीठ टीम

डहाणू आणि जव्हार उपकेंद्र प्रकल्पाबाबत वन हद्दीतून जाणाऱ्या अतिउच्च वीज दाब वाहिनीस परवानगी मिळण्यासंदर्भातील कार्यवाही जलद गतीने करण्यात यावी. वसई, विरार मधील चार आणि डहाणूमधील एका गावात वीज वितरणाच्या कामास मंजूरी देऊन, आदिवासी भागात १०० टक्के विद्युत पुरवठा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे. आदिवासीबहुल भागाचा विकास जलदगतीने करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

 

मंत्रालयात पालघर, डहाणू, जव्हार, वसई, विरार वीजपुरवठा, वीज उपकेंद्र उभारणे, किल्ल्यांची डागडुजी आदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विकासकामांची गती वाढविण्यासंदर्भात निर्देश दिले. या बैठकीस पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, महापारेषणचे मुख्य अभियंता पीयुष शर्मा, पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ, महावितरणचे अधीक्षक अभियंता किरण नागावकर, वसई महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील डहाणू उपकेंद्र ते सुर्यानगर कवडास आणि जव्हार उपकेंद्र प्रकल्पासंदर्भात वन हद्दीतून जाणाऱ्या अतिउच्च वीज दाब वाहिनीच्या परवानगी संदर्भात वन विभागाने पुढील आठ दिवसात कार्यवाही करावी, आणि हे उपकेंद्र उभारण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीने जलदगतीने कामे पूर्ण करावी.

 

पालघर आणि जव्हार पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करावयाचे आहे. आदिवासीबहुल गाव आणि पाड्यात १०० टक्के वीज वितरण होणे गरजेचे आहे. ज्या गावात कामे सुरू आहेत त्या कामांची गती वाढवावी आणि डहाणूमधील एक गाव व वसई, विरार मधील ४ पाड्यांमध्ये वीज वितरणास संबंधित विभागाने मान्यता द्यावी, जेणेकरून आदिवासीबहुल क्षेत्रात १०० टक्के विज वितरणाचे उद्दीष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. डहाणू आणि वसई, विरार क्षेत्रातील मंजुर आणि प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या कामांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही भुसे यांनी निर्देश दिले.

 

जव्हार क्षेत्रात सिमेंट नाला बांधकामास मान्यता द्यावी. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करण्यात यावीत. डहाणू येथील सिमेंट बंधारे कामाचा प्रस्ताव सादर करावा. बंधारे बांधताना शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा व्हायला हवा अशा पद्धतीने कामे करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले. कोहज किल्ल्याची डागडुजी आणि सुशोभीकरणाचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले.

 


Tags: Dadaji Bhuseडहाणूदादाजी भुसेपालघरवसईविरार
Previous Post

“स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे”: गुलाबराव पाटील

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी साजरी होणार विजयादशमी

Next Post
dr mohan bhagwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशी साजरी होणार विजयादशमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!