मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आगेकूच करत केंद्र सरकारने, राष्ट्राची समृध्द संस्कृती आणि वारसा याबाबत अभिमानाची भावना, प्रभावी नेतृत्व, शिस्त, राष्ट्रीय कर्तव्य भावना आणि देशभक्तीची भावना मुलांमध्ये विकसित करण्यासाठी मूल्याधारित शिक्षणावर अधिक लक्ष पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सैनिक शाळांच्या सध्याच्या स्वरुपात आमुलाग्र बदल करत, संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक शाळा सोसायटी अंतर्गत संलग्न सैनिक शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
प्रधानमंत्री @NarendraModi जी के नेतृत्व में आज मंत्रिमंडल द्वारा सैनिक स्कूल सोसायटी के साथ सरकारी और निजी क्षेत्र के 100 विद्यालयों की संबद्धता को स्वीकृति दी गयी।
नये शैक्षिक सत्र 2022 -23 से छठी कक्षा में 5,000 छात्रों को प्रवेश मिलेगा।
📖 https://t.co/jmooyvp58W pic.twitter.com/KFICUhN5x5
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 12, 2021
या शाळा विशिष्ट स्तंभ म्हणून काम करणार असून संरक्षण मंत्रालयाच्या सध्याच्या सैनिक शाळांपेक्षा या शाळा भिन्न असतील. पहिल्या टप्प्यात, 100 संलग्न भागीदार, राज्ये, स्वयंसेवी संस्था, खाजगी भागीदार यांच्यामधून घेणे प्रस्तावित आहेत.
लाभ :
- देशातल्या सर्व प्रांतातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किफायतशीर खर्चात मार्ग पुरवणार.
- सैनिक शाळांसाठीची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबर प्रभावी शारीरिक, मानसिक-सामाजिक, आध्यात्मिक, बौद्धिक, भावनिक विकास प्रदान करेल.
- जीवनातल्या विविध क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या युवकांची गुणवत्ता उंचावण्याबरोबरच, प्रशिक्षण कालावधी, प्रशिक्षकांची तैनाती, देखभाल, यांच्यात बचत होईल.