मुक्तपीठ टीम
सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने केरळमधील तिरुअनंतपुरमपासून गुजरातेतील केवडियापर्यंत सायकल रॅली काढली आहे. राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्याचा भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली आहे. सोळा सायकलस्वरांचा समावेश असलेली सायकल रॅली ११ ऑक्टोबर २०२१ रोजी गोव्यात दाखल झाली आहे. त्यानंतर ही रॅली महाराष्ट्रातून प्रवास करणार आहे. गुजरातेतील केवडियामधील सरदार पटेल स्मारकातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ तिचा समारोप होईल.
भारतीय नौदलातील सायकलस्वरांचा गट या सायकल रॅलीतील सायकलस्वारांना दाबोलिम येथील नौदल हवाई संग्रहालयापर्यंत सोबत घेऊन गेला. तेथे गोवा क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर अॅडमिरल फिलिपोज जी पायनुमूटील यांनी सायकलस्वारांशी संवाद साधला आणि त्यांचा सत्कार केला. सायकल स्वारांना संग्रहालयाच्या आजूबाजूच्या परिसराला भेट देण्यासाठीही नेण्यात आले.
केरळ ते गुजरात सायकल रॅली!
- २९ सप्टेंबर २०२१ रोजी तिरुअनंतपुरम येथून ही साकल रॅली सुरु झाली.
- ही सायकल रॅली कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातून प्रवास करेल.
- त्यानंतर या रॅलीचा २६ ऑक्टोबर २०२१ रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे समारोप होईल.
- २१०० किमी अंतराच्या परिसरातून जाणाऱ्या रॅलीमध्ये दक्षिण भागातून सीआयएसएफचे १५ जवान सहभागी आहेत.
- सहाय्यक कमांडंट अजयन टी, सीआयएसएफ युनिट, एमपीटी गोवा यावेळी उपस्थित होते.
- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.