मुक्तपीठ टीम
सध्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या एनसीबीचे मुंबईतील विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्यानं लक्ष्य केले जात आहे. मात्र, त्याविरोधानंतरही केंद्र सरकार आणि एनसीबी वानखेडेंमागे ठामपणे उभे असल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांना या महत्वाच्या पदावर पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे.
मुंबईतील कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे चर्चेत असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे समीर वानखेडे हे पुढील सहा महिन्यासाठी एनसीबीच्या विभागीय संचालकपदी कायम असणार आहेत.
वानखेडेंची तडफदार कारकीर्द
- समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत.
- त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती.
- त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.
- समीर वानखेडे हे ड्रग्सशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात.
- समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
- सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे समीर वानखेडे पती आहेत.
वानखेडेंनी भुषवलेली पदे
- एअर इंटेलिजन्स युनिटचे उपायुक्त
- राष्ट्रीय तपास यंत्रणेचे NIAचे अतिरिक्त एसपी
- महसूल गुप्तचर संचालनालयाचे संयुक्त आयुक्त
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक
वानखेंडेंच्या हिटलिस्टवरील सेलिब्रिटी
- मिका सिंग
- अनुराग कश्यप
- विवेक ओबेरॉय
- राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूडकर
- २०११ मध्ये सोन्याने मढवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर नेण्याची परवानगी दिली होती.