मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी मोहित कंबोजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून मेहुणा ऋषभ सचदेवला सोडून दिल्याचा आरोप केला आहे. एनसीबीने ऋषभला क्रूझ रेव्ह पार्टीतून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी कांबोज म्हणाले की, “जर माझ्या मेहुण्याने चूक केली असेल तर, सरकारला कारवाई करावी लागेल.”
नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर, मोहित कंबोज यांचे वक्तव्य
- नवाब मलिक यांनी माझ्यावर जो काही आरोप केला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. मी गेल्या दीड वर्षांपासून सक्रिय राजकारणात नाही. असे कंबोज म्हणाले.
- आज माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर आरोप झाले आहेत. यामुळे मला माझी बाजू मांडणे आवश्यक वाटले.
- ऋषभ सचदेव हा माझा मेहुणा आहे हे कंबोजने मान्य केले.
- मेहुणा त्या क्रूझमध्ये होता जिथे अनेक लोक उपस्थित होते. जेव्हा तो क्रूझवर जात होता, तेव्हा एनसीबीकडून तपासणी केली जात होती.
- आर्यन खानसह सर्व संशयितांची तपासणी करून त्यांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले.
- यानंतर या सर्वांना विचारण्यात आले की, ते ड्रग्जचे सेवन करतात की नाही. त्यांना तेथून सोडण्यात आले. एनसीबीला ज्यांचे उत्तर बरोबर वाटले त्यांच्यापैकी, ऋषभ ही एक होता.
जेव्हा एनसीबीला पटलं की, ऋषभचा आर्यन खानशी कोणताही संबंध नाही. तो सिगारेट ओढत नाही किंवा दारू पित नाही. यामुळे त्याला सोडून देण्यात आले. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जमुळे 6 ते 8 महिने तुरुंगात होता. सध्या नवाब मलिक आपले वैर बाहेर काढत आहेत. असे मोहित कंबोज म्हणाले.
मलिक आणि कंबोज यांच्यातील संघर्षाचा वाद
- मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांना त्यांच्याकडे ऋषभ ड्रग्स घेत किंवा विकत असल्याचा पुरावा आहे का? किंवा एनसीबीवर दबाव टाकून मला ऋषभची सुटका झाल्याचे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? असे प्रश्नं त्यांनी विचारले.
- मोहित कंबोज म्हणाले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचारावर नवाब मलिक गप्प का आहेत.
- मी आणि माझे कुटुंब कोणत्याही एजन्सीकडून माझी रक्त तपासणी करू शकतो. जर ड्रग्ज असतील तर, ते एक महिना शरीरात
राहतात. - नवाब मलिक आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत पण मी एनसीबीच्या कारवाईचे समर्थन करतो. कंबोज म्हणाले.
- महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.