मुक्तपीठ टीम
ड्रग्स प्रकरणी कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचा दावा एनसीबीचे डीडीजी ग्यानेश्वर सिंह यांनी केला आहे.
संपूर्ण कारवाई संशयास्पद असल्याच्या आरोपावर उत्तर
- नियमानुसार एनसीबीचे पथक साक्षीदारांसह क्रूझवर गेले होते.
- आतापर्यंत नऊ स्वतंत्र साक्षीदार या खटल्यात सामील झाले आहेत.
एनसीबीने ताब्यातील तिघांना सोडल्याच्या आरोपावर उत्तर
- नवाब मलिक यांनी एनसीबीने क्रुझवर ताब्यात घेतलेल्या तिघांना सोडल्याचा आरोप केला आहे.
- एनसीबीने चौकशी केल्यानंतर सहाजणांना सोडून देण्यात आल्याचे सांगितले.
- आठ जणांना अटक करण्यात आली.
- सोडलेल्यांना तपासादरम्यान गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते.
- नंतर चौकशी आणि खुलाशांच्या आधारे आणखी 10 लोकांना अटक करण्यात आली आहे.
- या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
एनसीबी कारवाईत भाजपा कार्यकर्ते असल्याच्या आरोपावर उत्तर
- एनसीबी कारवाई दरम्यान स्वतंत्र सार्वजनिक साक्षीदार आवश्यकता असते.
- अशा परिस्थितीत आमच्याकडे साक्षीदारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी वेळ नाही.
- या प्रकरणात ९ स्वतंत्र साक्षीदार आहेत.
- आम्ही त्यांना आधी ओळखत नव्हतो.
- एवढेच नाही तर एनसीबीने म्हटले आहे की ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाईट वागणूक आम्ही दिली नाही.