मुक्तपीठ टीम
आता अपघात झाला तर त्यांच्यासाठीही चारचाकी गाड्यांमध्ये असते तसं एअर बॅगचे संरक्षण असणार आहे. युरोपमध्ये शोधले गेलेले खास जॅकेट आणि जींसच बाइकस्वारांसाठी एअर बॅगचे काम करणार आहे. बाइक म्हटली की भन्नाट वेग, वाहत्या वाऱ्याशी स्पर्धा…मनमुराद स्वातंत्र्य…पण धोकाही तेवढाच असतो. कोणत्याही सेफ्टी गेअरशिवाय बाइक चालवणे हे कार चालवण्यापेक्षा धोकादायक आहे. देशाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात २०१९ मध्ये दर तासाला सहा दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ३७ टक्के दुचाकीस्वार मृत्युमुखी पडतात.
अभियंता मोझेस शाहरीवारची एअरबॅग जीन्स दुचाकीस्वारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. त्यांनी अशा सुपर स्ट्रॉंग जीन्स बनवल्या आहेत, ज्या एअरबॅगने सुसज्ज आहेत. जर ड्रायव्हरने जीन्स घालून दुचाकी चालवली तर अपघात होऊन पडल्यास एअरबॅग्स हवेने भरल्या जातील. आणि पडल्यावर शरीराला कमीतकमी मार लागेल.
या एअरबॅग्स अशा प्रकारे डिझाइन केल्या आहेत की त्या पुन्हा वापरल्या जाऊ शकतात. या गॅसने भरून पुन्हा वापरल्या जाऊ शकतात. एअरबॅग जीन्सला युरोपियन युनियनच्या हेल्थ अँड सेफ्टी स्टॅंडर्डने प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बर्याच क्रॅश टेस्ट केल्या जात आहेत. अशी अपेक्षा आहे की २०२२ पर्यंत ही जीन्स एअरबॅग बाजारात येईल.
शहरीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीराच्या खालच्या भागाला अशा प्रकारची सुरक्षा मिळत आहे हे पहिल्यांदा होत आहे. त्याच वेळी, वरच्या भागासाठी, एअरबॅग जॅकेटही लवकरच बाजारात येणार आहेत. ऑटोनॉमस इलेक्ट्रॉनिक नावाच्या आणखी एका कंपनीने एअरबॅग विकसित केल्या आहेत, ज्यातील हाय-टेक सेन्सर पडण्याच्या स्थितीत एअरबॅगना सक्रिय करतात. त्या आपोआप उघडतात.
पाहा व्हिडीओ: