मुक्तपीठ टीम
आयबीपीएस लिपिक भरतीसाठी अर्ज नाकारलेल्या उमेदवारांठी आणखी एक संधी. ६ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या ताज्या सूचनेनुसार, उमेदवार आता २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतील. आयबीपीएस लिपिक भरती २०२१ अंतर्गत ५ हजार ८५८ पदांसाठी अर्ज करण्यासाठी ibpsonline.ibps.in या पोर्टलवर अर्ज करू शकता.
- या पोर्टलवर उमेदवारांना प्रथम नवीन नोंदणीवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर, वाटप केलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून, उमेदवार त्यांचे आयबीपीएस लिपिक २०२१ ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.
शैक्षणिक पात्रता
इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२१ रोजी किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असावे, म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९२ पूर्वीचा नसावा आणि १ सप्टेंबर २००० नंतरचा असावा.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ८५० रूपये आकारले जातील.