मुक्तपीठ टीम
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा सध्या मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेला आहे. गोल्डन बॉय नीरज जगातील सर्वात सुंदर ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत असेल पण तो नेहमीच त्याच्या खेळाबद्दल आणि भाला फेकण्यामध्ये कसे चांगले व्हावे याबद्दल विचार आणि प्रयत्न करत असतो. त्याचे दर्शन त्याच्या मालदिव सुट्टीवर घडत आहे.
नेहमीच भाला फेकेत नीरजची एकाग्रता आणि उत्कटता कायम
- त्याने स्वतः त्याच्या खेळाबद्दल किती गंभीर आहे याचे वैशिष्ट्य एका व्हिडीओद्वारे शेअर केले आहे.
- २३ वर्षीय गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा मालदीवमधील फुर्वेरी रिसॉर्टमध्ये राहतो.
- येथे स्कुबा डायव्हिंग दरम्यानही तो पाण्याखाली भाला फेकण्याच्या स्टायलित हालचाली करत आहे. पाण्याखालील हा व्हिडीओ त्यांने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर शेअर केला.
- व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नीरजने लिहिले, “आकाशात, जमिनीवर किंवा पाण्याखाली, मी नेहमी भाला फेकण्याचा विचार करतो. त्यांनी पुढे लिहिले की प्रशिक्षण सुरू झाले आहे.”
व्यस्त वेळापत्रक आणि आजारपणामुळे नीरज चोप्राने आपला सीजन लवकर संपवला. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा तो फक्त दुसरा भारतीय आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये ८७.५८ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. त्याने हा थ्रो त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात केला.
ऑलिम्पिकनंतर नीरज खूप व्यग्र होता
- टोकियो ऑलिम्पिकमधून घरी परतल्यानंतर नीरज चोप्रा खूप व्यग्र आहे. ज्याचा त्याच्या आरोग्यावरही परिणाम झाला.
- यावेळी त्याने त्याचा २०२१ चा सीजन लवकर संपवला आहे.
- भविष्यातील स्पर्धांसाठी आधीच सराव सुरू केल्यानंतर तो सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.