Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता मंदिरातील प्रसादालाही अन्न सुरक्षा प्रमाणपत्र…सेफ भोग प्रमाणपत्र!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, धर्म
0
महाकाल

मुक्तपीठ टीम

देशात सध्या अन्न पदार्थांच्या सुरक्षेला कमालीचं महत्व दिले जात आहे. त्यासाठी असलेल्या फुड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जर योग्य प्रमाणपत्र किंवा नोंदणी नसेल तर अन्न पदार्थ विकताच येणार नाहीत, असे आदेश देण्यात आले आहेत. अनेक व्यावसायिकांकडून त्याविरोधात तक्रारी करण्यात येत आहे. पण त्याचवेळी मध्यप्रदेशातील महाकालेश्वर मंदिराने मात्र प्रसादाच्या लाडूंसाठी असलेले सेफ भोग प्रमाणपत्र मिळवले आहे. आता देशभरातील मंदिरांमधील प्रसादासाठी हे प्रमाणपत्र तपासणीनंतर दिले जाईल.

 

श्री महाकालेश्वर मंदिराचा लाडू लाडू प्रसाद आणि परिसरात उपलब्ध अन्नाची गुणवत्ता प्रमाणित करण्यात आली आहे. श्री महाकालेश्वर मंदिर समितीद्वारे तयार केल्या जाणाऱ्या लाडू प्रसादाला FSSAI (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया) द्वारे सुरक्षित प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मोफत अन्न क्षेत्र, लाडू प्रसाद उत्पादन युनिट आणि श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समिती संचालित अन्न वाटप स्थळाला सुरक्षित भोग स्थळ प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. या तीन ठिकाणांचे दर सहा महिन्यांनी लेखापरीक्षण केले जाईल. म्हणजेच, जर प्रणाली मानकांशी सुसंगत असल्याचे आढळले तरच प्रमाणपत्र दिले जाईल. मंदिर समिती आता लाडू प्रसादाच्या पॅकेटवर विशेष ‘भोग’ टॅग लावू शकणार आहे. देशातील धार्मिक स्थळांवरील स्वच्छ आणि सुरक्षित भोग प्रसाद आणि अन्न पुरवण्यासाठी ‘भोग’ हा टॅग लावला जाणार आहे.

 

भोग शब्दाचा अर्थ:

भोग हा शब्द इंग्रजीच्या चार अक्षरांनी बनलेला आहे.
बी – ब्लिसफुल
एच – हाइजीनिक
ओ – ऑफरिंग
जी – गॉड
देवाला अर्पण केलेला स्वच्छ प्रसाद. असा ह्या चार अक्षरांचा अर्थ आहे.

 

भक्तांसाठी प्रसाद…श्रद्धेसह सुरक्षा!

  • बाबा महाकाळचे दर्शन घेण्यासाठी दररोज देशभरातून मोठ्या संख्येने भाविक महाकालेश्वर मंदिरात येतात.
  • ते नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना वाटण्यासाठी येथून लाडूचा प्रसाद घेऊन जातात.
  • ते अन्नक्षेत्रात अन्नही घेतात.
  • भोग प्रमाणपत्रामुळे या साऱ्या भक्तांच्या मनात श्रद्धेच्या जोडीला सुरक्षाही वाढणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bhogfssaimahakaleshwar templemuktpeethSafe bhog certificateujjainउज्जैनभोगमहाकालेश्वर मंदिरमुक्तपीठ
Previous Post

मुंबई-पुण्यातच पाचशेवर नवे रुग्ण! राज्यात २,६९२ नवे रुग्ण, २,७१६  रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

भाला फेक स्टायलीत स्कुबा डायव्हिंग…नीरज चोप्राचा वायरल व्हिडीओ!

Next Post
neeraj

भाला फेक स्टायलीत स्कुबा डायव्हिंग...नीरज चोप्राचा वायरल व्हिडीओ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!