मुक्तपीठ टीम
सुप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी मर्सिडिझ येत्या काही दिवसात भारतात मेड इन इंडिया मर्सिडिझ बेंझ एस क्लास लाँच करणार आहे. मर्सिडिझ बेंझ कारचे हे नवीन मॉडेल आहे. यात आणखी एक चांगली बाब अशी की, ही कार मर्सिडिझच्या इतर मॉडेल्सपेक्षा स्वस्त असेल. कारण ती मेड इन इंडिया आहे. यापूर्वी, मर्सिडिझ बेंझ एस-क्लासच्या इतर कार कंप्लीटली बिल्ड युनिट म्हणून येत असत आणि त्यांची किंमत खूपच जास्त होती. ही कार बीएमडब्ल्यू 7 सिरीज आणि ऑडी ए8 सारख्या कार्सना टक्कर देईल.
मेड इन इंडिया मर्सिडिझ बेंझ कारच्या किंमती असणार कमी
- या वर्षाच्या सुरुवातीला मर्सिडिझ बेंझ एस-क्लास कार 2.17 कोटी ते 2.19 कोटी रुपयांपर्यंत लाँच करण्यात आल्या होत्या. सीबीयू युनिट कार असल्याने त्यांच्या किंमती जास्त होत्या.
- आता मर्सिडिझ बेंझ भारतातच एस-क्लास कार्सचे उत्पादन करणार आहे, जी सीकेडी युनिट असेल त्यामुळे याची किंमत कमी असेल.
- कंपनी स्थानिक पातळीवर नवीन एस-क्लास 7 ऑक्टोबर रोजी लाँच करणार आहे.
- असे मानले जाते की, मर्सिडिझ-बेंझ एस-क्लास सीकेडी युनिटची किंमत सीबीयू युनिटपेक्षा ४० लाख रुपयांनी कमी असू शकते.
मर्सिडिझ बेंझ एस-क्लास सीकेडीचे खास फिचर्स
- मेड इन इंडिया मर्सिडिझ बेंझ एस-क्लास कारमध्ये 12.8 इंच पोर्ट्रेट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
- 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- अॅम्बियंट लाइटिंग, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल
- एडजस्टेबल फ्रंट सीट, बर्मेस्टर 4डी साराउंड मिळेल.
- साउंड सिस्टम, रियर सीट एन्टरटेनमेंट सिस्टमसह अनेक विशेष फिचर्स असू शकतात.
- मर्सिडिझ-बेंझ एस-क्लास सीकेडी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाऊ शकते, जी 9 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायाशी जोडली जाईल.