मुक्तपीठ टीम
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील रिक्त असलेल्या तीन लोकसभेच्या आणि ३० विधानसभेच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने मंगळवारी अधिसूचना जारी केली असून या सर्व जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याचे म्हटले आहे. ज्या तीन लोकसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे त्यामध्ये दादरा नगर हवेली, मध्य प्रदेशातील खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देमहाराष्ट्रागलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचाही यात समावेश आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे.
कोणत्या राज्यांमध्ये, किती जागेवर पोटनिवडणुका?
लोकसभा
- दादरा नगर हवेली
- मध्य प्रदेश – खंडवा
- हिमाचल प्रदेश- मंडी
विधानसभा
- महाराष्ट्र १
- आंध्र प्रदेश १
- आसाम ५
- बिहार २
- हरियाणा १
- हिमाचल प्रदेश ३कर्नाटक २
- मध्य प्रदेश ३
- मेघालय ३
- नागालँड १
- राजस्थान २
- तेलंगणा १
- पश्चिम बंगाल ४
अकाली निधनानंतर लोकसभेच्या तीन जागा रिक्त
- दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह या वर्षी फेब्रुवारीमध्ये हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त आहे.
- याशिवाय मध्य प्रदेशातील खंडवाचे भाजपा खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचेही याच वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे निधन झाले.
- त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपा खासदार रामस्वरूप शर्मा यांचा मृतदेहही त्यांच्या दिल्लीच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला.
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या जागेचा समावेश आहे.
- नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.
- देगलूर विधानसभेसाठी ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे.
- तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
- काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.
- त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती.
- आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.