Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांचे समाधान होईपर्यंत सर्वस्तरावर पाठपुरावा करणार”:  सुनील केदार

September 28, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
sunil kedar

मुक्तपीठ टीम

 संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या सुखदुःखाला समजून घेत आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे त्यांच्या समस्या माहिती आहेत. या समस्यांवर समाधान शोधणे गरजेचे असून संत्रा फळाच्या गळतीमुळे उत्पादक सध्या त्रस्त आहे. यावर संशोधन झाले पाहिजे. नेमके ईलाज शोधले गेले पाहिजे. त्यासाठी संत्रा उत्पादक शेतकरी, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या संस्था मिळून दर महिन्याला कार्यशाळा आयोजित करतील, असे निर्देश पदुम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले.

            

भारतीय कृषी अनुसंधान केंद्र अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था (आयसीएआर-सीसीआरआय) मार्फत आयोजित फळ गळती व्यवस्थापन कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर आयसीएआर -सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष, आयसीएआरचे फळबाग विभागाचे उपमहासंचालक डॉ. बी. के. पांडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे संशोधन विभागाचे संचालक डॉ. विलास खर्चे, सीसीआरआयचे प्रमुख संशोधक डॉ. आर. के सोनकर, नागपूर कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई सहसंचालक शंकर टोटवार आदी मान्यवरांची उपास्थिती होती.

            

अमरावती व नागपूर विभागातील संत्रा उत्पादक या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विभागातील काही भागात खराब हवामानामुळे फळगळ दिसून आली आहे. भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने या परिस्थितीत संत्रा व मोसंबी फळबागेत पावसाळ्यातील फळगळतीचे व्यवस्थापन करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील केदार उपस्थित होते.

            

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी, कोरोना काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद असताना शेतकऱ्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीला हातभार लावल्याबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक केले. नागपूर परिसरातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांचा आपला अभ्यास आहे. मात्र यामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. यासाठी ‘सीसीआरआय’ मार्फत उत्तम दर्जाच्या कलमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तसेच नागपुरी संत्र्याला जागतिक बाजारपेठ मिळाली पाहिजे. या दृष्टीने संशोधन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेत त्यावर उपाय शोधण्याचे यावेळी त्यांनी निर्देशित केले.

            

क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल. त्यासाठी या केंद्राचे मार्गदर्शन घ्यावे, दुर्गम भागात जाणाऱ्या शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन ऑनलाइन देखील केले गेले पाहिजे, शेतकऱ्यांनी सध्याच्या फळं गळतीवर नेमके उपाय काय उपाय आहेत. यावर चर्चा करावी, असे त्यांनी यावेळी निर्देशीत केले.          

             

शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील संवादाला मंत्र्यांनी उपस्थित रहावे. आता वेळ द्यावा. प्रश्नामध्ये हस्तक्षेप करावा, यासाठी काही शेतकऱ्यांनी कार्यक्रमातच उभे राहून विनंती केली. त्यामुळे मार्गदर्शनासाठी आलेल्या  मंत्र्यांनी पूर्वनियोजित दौरा पुढे ढकलत शेतकऱ्यांच्या समस्या या वेळी ऐकून घेतल्या. नागपूर व अमरावती विभागातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी उपस्थित सर्व प्रश्नांवर तोडगा काढत आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यातील प्रश्नोत्तराच्या सत्रात स्वतः हस्तक्षेप करीत कालमर्यादेत समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देशित केले. यावेळी विविध साहित्याचे प्रकाशन करण्यात आले. आभार प्रदर्शन डॉ. आर. के. सोनकर यांनी केले.

            

शेतकऱ्यांना सीसीआरआयने कलमा उपलब्ध कराव्या, अनुदान नको मात्र उपयोगी मार्गदर्शन करण्याचे आवाहन, संत्रा उत्पादनातील इस्त्रायल व स्पेनच्या जाती आयात करण्यात याव्यात, फळ पिकावर येणाऱ्या कीड-रोगांचे परिक्षण करण्यात यावे, प्रत्येक शेतकऱ्याला संत्रा उत्पादना संदर्भातील पुस्तिका देण्यात यावी, माती परीक्षण प्रत्येक तालुकास्तरावर करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, क्रॉप न्यूट्रिशनकडे विद्यापीठाने लक्ष घालावे, पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकाप्रमाणे दबावगट तयार व्हावा, अशा मागण्या संत्रा उत्पादकांनी मांडल्या.


Tags: SUNIL KEDARआयसीएआरनागपूरविदर्भसीसीआरआयसुनील केदार
Previous Post

“वाघ आणि वाळवी यातील फडणवीसांना फरक कळू नये, हे दुर्दैव!”

Next Post

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीयांची दिलजमाई…एक-दोन जागांचा तिढा सुटला तर सत्ता वाटपाचा जळगाव पॅटर्न!

Next Post
Jalgaon

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीयांची दिलजमाई...एक-दोन जागांचा तिढा सुटला तर सत्ता वाटपाचा जळगाव पॅटर्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!