मुक्तपीठ टीम
आता मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. मराठवाड्यातील उन्हाळ्यात होणारी दयनीय स्थिती आता सुधारणार आहे. आता पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक येथील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न लकरच सुटणार आहे.
सरकारची आगामी योजना
- औरंगाबादमध्ये पत्रकार परिषेद जयंत पाटील बोलत होते.
- यावेळी त्यांनी सांगितले की,“जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांची वहन क्षमता वाढवणार आहोत.
- जायकवाडी धरणातील गाळ काढला तर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल.
- तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधील नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- आगामी काळात गोदावरी नदीवर ७८२ नवे बंधारे उभारण्यात येणार आहेत.
जयंत पाटीलांनी केली ज्यमंत्री भागवत कराडांकडे विनंती
- भागवत कराड यांना विनंती आहे की, नदीजोड प्रकल्पासाठी केंद्रातून निधी आणावा. ते सध्या केंद्रात आहेत.
- जलसंपदा विभागाच्या भरतीबाबत वित्तविभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
- जलसंपदा विभागाला लागणारे मनुष्यबळ अधिकाऱ्यांना लागेल तसे उपलब्ध करून घ्यावे.