मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. ईडीने पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार आता २८ सप्टेंबर रोजी अनिल परब यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना ३१ ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. पण यामुळे ऐन मनपा निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वी शिवसेनेची कोंडी वाढताना दिसत आहे. कारण अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि सेनेच्या रणनीतीत महत्वाची भूमिका पार पाडणारे म्हणून ओळखले जातात.
अनिल परबांना कशासाठी ईडीची नोटीस
- परिवहनमंत्री अनिल परब यांना २९ ऑगस्ट रोजी ईडीने पहिलं समन्स पाठवलं होतं.
- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने हा समन्स बजावला आहे.
- त्यावेळी याबद्दलची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली होती.
- त्यांना ईडीने ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं होतं.
अनिल परबांची प्रतिक्रिया
- “मला ईडीची नोटीस मिळाली आहे.
- त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही.
- जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे.
- नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे.
- नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे.
- मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन.
- नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल.
- नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ.