मुक्तपीठ टीम
एकीकडे भारतातील स्वस्त इंटरनेटच्या महास्पर्धेमुळे जेरीस आलेल्या व्होडाफोन आयडियाने दुसरीकडे हार न मानता स्पर्धा सुरु ठेवलेली आहे. वीआयने नुकत्याच केलेल्या दाव्यानुसार, त्यानी सेकंदाला ३.७ गीगाबाइट्सच्या स्पीडचा विक्रम केला आहे. हा वेग भारतातील कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या आजवरच्या वेगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. कंपनीच्या 5जी नेटवर्कचा हा वेग पुण्यात एका चाचणी दरम्यान दिसला आहे.
त्याच वेळी, जूनमध्ये, जियोने चाचणी दरम्यान १जीबीपीएस चा स्पीड रेकॉर्ड सेट केला होता. तर एअरटेलने जुलैमध्ये असाच विक्रम केला होता. डाउनलोडिॆगचा स्पीड १.५ गीगाबाइट्स/ सेकंद होता
Vi has recorded top #5G speeds in its ongoing 5G trials! We are conducting the trials on govt. allocated 5G spectrum in the cities of Pune (Maharashtra) and Gandhinagar (Gujarat), along with our technology vendors. To know more, read https://t.co/ZmO3vvQqeX.
— Vi_News (@VodaIdea_NEWS) September 19, 2021
वीआयचा 5G वेगाचा विक्रम
- डाऊनलोड स्पीडमध्ये १.५ जीबीपीएसचा विक्रम केल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
- हा विक्रम गांधीनगर आणि पुणे शहराच्या मिड बँड स्पेक्ट्रमवर होता.
- व्होडाफोन आयडियाला दूरसंचार विभागाने २६ गीगाहर्ट्झचे हाय फ्रिक्वेन्सी बँड दिले आहेत.
- 5जी चाचण्यांसाठी ३०५ जीएचझेड चे ट्रेडिशनल स्पेक्ट्रम बँड सापडले आहेत.
व्होडाफोनची पुण्यात 5G प्रयोगशाळा
- व्होडाफोनने पुणे शहरात 5जी चाचण्यांसाठी प्रयोगशाळा उभारली आहे.
- क्लाउड कोरचे नेटवर्क, नवीन जनरेशन ट्रान्सपोर्ट आणि रेडिओ एक्सेस नेटवर्कसह ही प्रयोगशाळा पूर्णपणे सुसज्ज आहे.
रिलायन्स जियो, एअरटेल, व्होडाफोन आणि एमटीएनएलच्या अर्जांना मान्यता
- या वर्षी मे महिन्यात दूरसंचार विभागाने रिलायन्स जियो, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएलच्या अर्जांना मंजुरी दिली होती.
- त्यांना टेलीकॉमचे उपकरण निर्माते एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉट यांच्यासह 6 महिन्यांच्या चाचणीसाठी मान्यता देण्यात आली आहे.