Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे’ हा केंद्रासाठी ठरणारा हजार ते दीड हजार कोटी उत्पन्नाचा ‘सुपर गेट वे’!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mumbai-Delhi expressway

मुक्तपीठ टीम

केंद्रीय रस्ते वाहतुक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली मुंबई एक्स्प्रेस बद्दल माहिती दिली. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे कार्यान्वित झाल्यावर केंद्राला दरमहा १००० ते १५०० कोटी रुपये टोल मिळेल. हा बहुप्रतिक्षित एक्स्प्रेस वे २०२३ मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

 

गडकरींनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला ‘सोन्याची खाण’ म्हणून संबोधले आहे. गडकरींनी अलीकडेच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक लांबचा प्रवास केला. पुढील रविवारी एनएचएआयचे वार्षिक टोल उत्पन्न १.४० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असे त्यांनी रविवारी सांगितले. सध्या ते ४०,००० कोटींच्या पातळीवर आहे.

 

केंद्राचा ‘सुपर गेट वे’

  • दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग राष्ट्रीय राजधानी क्षेत्राव्यतिरिक्त इतर चार राज्यांमधुन जाईल.
  • देशातील राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा ही जागतिक दर्जाची यशोगाथा आहे असे गडकरी म्हणाले. .
  • “एकदा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग कार्यान्वित झाल्यावर आणि लोकांसाठी खुला झाल्यावर, तो केंद्राला दरमहा १००० ते १,५०० कोटी रुपयांचा टोल महसुल देईल.” असे गडकरींनी स्पष्ट केले.

 

देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे

  • दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे बांधकाम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
  • हा एक्स्प्रेस वे ‘भारतमाला योजने’च्या पहिल्या टप्प्यांतर्गत बांधला जात आहे.
  • हा आठ लेनचा एक्स्प्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून जाईल.
  • यामुळे दिल्ली ते मुंबई हा आत्ताचा २४ तासांचा प्रवास १२ तासात करता येईल.

 

एनएचएआयवर कर्जाचा भार खूप जास्त आहे, याची गडकरींनी चिंता व्यक्त केली. नोडल एजन्सीला ‘ट्रिपल ए’ दर्जा देण्यात आला आहे असे ते म्हणाले. हा एक्सप्रेस वे सोन्याची खाण आहे. एनएएचचे टोल उत्पन्न पुढील पाच वर्षांत वार्षिक १.४० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. ते आता ४०,००० कोटी रुपये आहे. मार्च महिन्यात संसदेच्या परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीवरील स्थायी समितीने एनएचएआयवरील ९७,११५ कोटी रुपयांच्या कर दायित्वावर चिंता व्यक्त केली होती. अलिकडेच गडकरींनी राज्यसभेत सांगितले की, एनएचएआय चे एकूण कर्ज या वर्षी मार्च अखेरीस वाढून ३,०६,७०४ कोटी रुपये झाले आहे. मार्च २०१७ च्या शेवटी ते ७४,७४२ कोटी रुपये होते.


Tags: mumbai-DelhiNitin Gadkariकेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीमुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे
Previous Post

सोनू सुदने जमवले १९ कोटी, मदतीवर खर्च केले फक्त २ कोटी!

Next Post

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे: कामगारांचा शक्तिशाली पण संयमी, अष्टपैलू नेता!

Next Post
Chalitale Tower

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे: कामगारांचा शक्तिशाली पण संयमी, अष्टपैलू नेता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!