मुक्तपीठ टीम
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील बांधकाम सुरु असलेला एका मोठ्या पुलाचे गर्डर कोसळले आहे. या दुर्घटनेत किमान २१ कामगार जखमी झाले आहेत. त्या जखमींना मुंबई मनपाच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आजच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत.
नेमकी कशी झाली दुर्घटना?
- मुंबईचा बीकेसी परिसरात एमएमआरडीएच्या पुलाचं काम सुरु होतं.
- पहाटे साडेचारच्या सुमारास पुलाचा गर्डर कोसळला.
- क्रेनच्या सहाय्यानं अत्यंत सावकाश काम सुरू असताना तांत्रिक अडचणीमुळे दाब कमी झाल्यानं दुर्घटना घडली.
- त्यावेळी या भागावर किमान २० ते २४ कामगार काम करत होते.
- या कामगारांमध्ये दोन अभियंतेही होते.
- गर्डर कोसळू लागताच काही कामगारांनी घाबरुन जवळच्या पाण्याच्या टाकीत उडी मारली.
- काही कामगार गर्डरजवळच्या सळईला लटकले.
- या दुर्घटनेत किमान १३-१४ जखमी झाले आहेत.
- सांताक्रुझच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दुर्घटनेमुळे २०२२चा मुहूर्त हुकणार?
- एमएमआरडीए प्रशासनाने दुर्घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
- या पुलाचे काम जे. कुमार ही कंपनी करत आहे.
- या पुलाचे काम २०२२पर्यंत होणं अपेक्षित आहे.
- पण आजच्या दुर्घटनेमुळे पूल पूर्ण होऊन वापरात येण्याची मुदत पुढे जाण्याची भीती आहे.