Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे मुक्तपणे बोलले…

'भावी सहकारी' संबोधत रेल्वे रुळावरून स्टेशनवर येण्याची ऑफर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Maha cm

मुक्तपीठ टीम

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, एमआयएम खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”.अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

  • रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावर माझ्या राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.
  • मुंबई-नागपूर बुलेट हा प्रोजेक्ट राज्यासाठी महत्वाचा ठरेल आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी आपले वजन वापरून त्यासाठी पुढाकार घ्यावा.
  • दानवे जर पुढाकार घेत असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल.
  • मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रुळ सोडून इंजिन इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता”
    काय म्हणाले रावसाहेब दानवे?
  • दानवेंनी या कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली.
  • आज १७ तारखेला आमचा स्वातंत्र्याचा दिवस उजाडला, स्वातंत्र्याच्या 1 वर्षांनी देशात विलीन होता आलं.
  • १७ सप्टेंबर हा आम्ही स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतो. ग्रामीण विकासाचा पाया म्हणजे जिल्हा परिषद आहे. मी या जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यावेळी भाजप नव्हता जनता पक्ष होता, आणि नांगराच्या चिन्हावर मी निवडून आलो होतो. तेव्हा वाटायचं एक बिल्डिंग असावी ती आज पूर्ण झाली.
  • मला तेव्हा ६५ रुपयांच्या भत्त्याचा चेक मिळाला, मला चेक देताना मॅनेजर मला ओळखेना कारण मी सभापती असेन असं त्याला वाटत नव्हतं.
  • अब्दुल सत्तार यांनी काही मागण्या केल्या. मराठवाडा सध्या मागास नाही, आमच्या सरकारने सर्वात जास्त निधी उपलब्ध केला. समृद्धी महामार्ग, नांदेड महामार्ग सुद्धा आम्ही मंजूर केला.
  • सोलापूरपासून धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाही तर रावसाहेब दानवे यांना मतदान करून नका, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. मग मी पण म्हणालो सिलोड जिल्हा झाला नाही तर अब्दुल सत्तार यांना मतदान करू नका.
  • मी ४१ वर्षापासून राजकारणात आहे. ४१ वर्षांपूर्वी स्टेजवर बसलेली एकही व्यक्त राजकारणात नव्हती. तुम्ही माझ्याकडून काही अपेक्षा ठेवता तशा मी पण काही अपेक्षा ठेवतो.
  • मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचं प्रेझेंटेशन आम्ही तयार केलं. फक्त ३५ टक्के जमीन आम्हाला अधिक लागणार आहे. ते प्रेझेंटेशन घेऊन मी आपल्याला भेटणार आहे, त्याला परवानगी द्या, असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं.

 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले आणखीनही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

  • मराठवाड्यासाठी पैठणमध्ये संतपीठाची घोषणा
  • औरंगाबादची पर्यटन क्षेत्रात समृद्ध बनवणार
  • घृष्णेश्वर पुरातन मंदिरात सभामंडपाचे काम
  • मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
  • निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार
  • परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार
  • औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना

Tags: raosaheb danveUddhav Thackeray Nhava sheva Water Projectअब्दुल सत्तारऔरंगाबाद पर्यटनमराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीरावसाहेब दानवेसुभाष देसाई
Previous Post

“सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पुलाचा भाग कोसळल्याचा फटका, पुलाचे काम रेंगाळण्याची भीती!

Next Post
bkc

वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पुलाचा भाग कोसळल्याचा फटका, पुलाचे काम रेंगाळण्याची भीती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!