Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना समजावली ठाकरे स्टाईल…

"निधी कमी पडून देणार नाही, पण कामाचा हिशोब हवाच!"

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm-abdul sattar

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीचं भूमीपूजन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, उदय सामंत, इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे उपस्थित होते. ४५ वर्षात इमारतीचं दुसऱ्यांदा उद्घाटन असा प्रकार आता होणार नाही, अब्दुलजी आणखी २० कोटी मिळतील पण मला त्याचा हिशोब हवाय, जे करायचं ते सरळ करेन, मला इकडे ही इमारत उभी राहिलेली पाहिजे म्हणजे पाहिजेच. दया माया चालणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

  • मुख्यमंत्र्यांनी निधी देण्यासाठी ३ अटी घातल्या.
  • इमारतीच्या कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे.
  • काम झाल्यानंतर कारभाराचा दर्जासुद्धा उत्तम असला पाहिजे.
  • ही इमारत वेळेत पूर्ण झाली पाहिजे.
  • आणि हे जर मान्य असेल तर मी पैसा कमी पडू देणार नाही. पण मला तारखा द्याव्या लागतील. तारखेवर कामं पूर्ण झाली तर पैसे मिळतील, असंही त्यांनी सांगितलं.
  • जे काही गरजेचं आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही.
  • वातावरणातला बदल हे दुर्भाग्य आहे आपलं.
  • अतिवृष्टीसुद्धा अशी होतेय की काही दिवसांचा पाऊस काही तासात पडतोय.
  • जिल्हा परिषद हे जनतेची सेवा करणारं मंदिर आहे. याचं पावित्र्य जपलं पाहिजे.
  • मराठवाड्यात संतपीठ पाहिजेच, मराठवाडा संतांची भूमी आहे. जनता बघायला पाहिजे असं कार्यालय झालं पाहिजे.
  • मी मुंबईत एक वार्ड ऑफिसचं उद्घाटन केलं. ते मला आवडलं कारण तिथे व्यायाम करण्यासाठी जिम बनवली आहे. इथे सुद्धा तशा गोष्टी झाल्या पाहिजेत.

Tags: abdul sattarbalasaheb thoratbhagwat karadraosaheb danvesubhash desaiअब्दुल सत्तारउदय सांमतऔरंगाबादमराठवाडामुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पुलाचा भाग कोसळल्याचा फटका, पुलाचे काम रेंगाळण्याची भीती!

Next Post

“पुणे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू”

Next Post
eknath shinde

"पुणे मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!