मुक्तपीठ टीम
ओलाच्या ई-स्कूटरला लाँचिंगआधीच मिळालेला लक्ष-लक्ष ग्राहकांचा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे तशीच ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी जाहीर केलेली नवी माहितीही तशीच वेगळी आणि चांगली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या उत्पादन प्रकल्पाची संपूर्ण सूत्रं ही महिलांच्या हाती असतील. म्हणजेच ५०० एकरात पसरलेली ओला फ्यूचर फॅक्टरी संपूर्णपणे महिलांकडून चालवली जाणार आहे. तेथे १० हजारांपेक्षा जास्त महिलांना रोजगारही मिळेल. हा फक्त महिला कामगारांचा जगातील सर्वात मोठा कारखाना असेल.
या संदर्भात भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे. “आत्मनिर्भर भारताला, आत्मनिर्भर महिलांची गरज आहे! मला हे सांगताना अभिमान वाटतो की, ओला फ्यूचरफॅक्टरी पूर्णपणे महिलांद्वारे चालविली जाईल, तिथे १० हजारांपेक्षा जास्त महिला काम करतील. हा फक्त महिला कामगारांचा जगातील सर्वात मोठा कारखाना असेल.”
Aatmanirbhar Bharat requires Aatmanirbhar women!
Proud to share that the Ola Futurefactory will be run ENTIRELY by women, 10,000+ at full scale! It’ll be the largest all-women factory in the world!!🙂
Met our first batch, inspiring to see their passion!https://t.co/ukO7aYI5Hh pic.twitter.com/7WSNmflKsd
— Bhavish Aggarwal (@bhash) September 13, 2021
दहा हजारांपेक्षा जास्त महिला!
- भाविश अग्रवाल यांनी याबद्दलचा एक व्हिडीओ ही शेअर केला आहे, ज्यात या योजनेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त महिलांची पहिली बॅच दाखवली आहे.
- त्यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, कंपनीने या आठवड्यात पहिल्या बॅचचे स्वागत केले आहे.
- पूर्ण क्षमतेने सुरु झाली की फ्यूचर फॅक्टरी १० हजारांपेक्षा जास्त महिलांना रोजगार देईल.
- जे जगातील सर्वात मोठे आणि एकमेव सर्व महिला कामगार असलेले ऑटोमोटिव्ह उत्पादन युनिट असेल.
India’s women will bring the EV revolution from India to the world!
When women are equal participants in India’s economic growth, India will lead the world!#JoinTheRevolution pic.twitter.com/65LBJOcykM
— Bhavish Aggarwal (@bhash) September 13, 2021
महिलाच सूत्रधार!
- ओला कंपनीने उत्पादन कौशल्यांच्या मुख्य क्षेत्रांमध्ये महिला कामगारांना प्रशिक्षण आणि अतिरिक्त कौशल्ये प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे.
- त्या ओला फ्यूचरफॅक्टरीमध्ये तयार केलेल्या प्रत्येक वाहनाच्या संपूर्ण उत्पादनासाठी जबाबदार असतील.
- ओलाने गेल्या वर्षी तमिळनाडूमध्ये आपला पहिली इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी उभारण्यासाठी २,४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.
- बुकिंग आधीच सुरू झाले आहे आणि ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीही सुरू होईल.
पाहा व्हिडीओ