मुक्तपीठ टीम
फेसबुक हा जगभरातला प्रसिद्ध असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. फेसबुक आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतो. आपल्य नाविन्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारा हा बँड आता चर्चेत आला आहे तो नव्या स्मार्ट गॉगलनुळे. फेसबुकने एक स्मार्ट ग्लास बनवला आहे, जो रे-बॅनसोबत लॉन्च करण्यात आला आहे. फेसबुकने रे-बॅन स्टोरीज या नावाने २० वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये स्मार्ट ग्लासेस लाँच केले आहेत. याचे वैशिष्ट्य असे आहे की, याद्वारे वापरकर्त्यांना चालता फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करता येतात. या स्मार्ट ग्लासमुळे लोकांना गाणी ऐकण्याची आणि फोन कॉल घेण्याची ही सुविधा मिळेल. स्मार्ट ग्लासमध्ये ५ मेगापिक्सलचा इंटीग्रेटेड कॅमेरा आहे.
अनोख्या स्मार्ट ग्लासेसचे फिचर्स
- स्मार्ट ग्लासमध्ये ५ मेगापिक्सलचा इंटिग्रेटेड कॅमेरा देण्यात आला आहे.
- वापरकर्ते कॅप्चर बटण वापरून ३० सेकंदांपर्यंतचे व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात किंवा फेसबुक सहाय्यक व्हॉइस कमांडसह हँड्स-फ्री करू शकतात.
- रे-बॅन स्टोरीज इनबिल्ट स्पीकर्ससह येतात. यात तीन-मायक्रोफोन ऑडिओ अॅरे आहे जे कॉल आणि व्हिडीओंसाठी व्हॉईस आणि व्हॉईस ट्रान्समिशन देते.
- यामध्ये बीमफॉर्मिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जो कॉलवर असताना अतर आवाज कमी करतो.
- रे-बॅन स्टोरीजला नवीन फेसबुक व्ह्यू अॅपसह जोडले जाते, जेणेकरून वापरकर्त्यांना सोशल मीडियावर स्टोरीजही शेअर करता येतील.
- आयओएस आणि अँड्रॉइडवरील फेसबुक व्ह्यू अॅप फोनवरील अॅप्समध्ये स्मार्ट ग्लासेसवर कॅप्चर केलेले कन्टेन्ट इंपोर्ट, शेअर आणि एडिट करणे सोपे करेल.
रे-बॅन स्टोरीज स्मार्ट ग्लासेसची किंमत
- स्मार्ट ग्लासेसला फेसबुकने एसीलोर ल्यूस्कोटीकाच्या भागीदारीत तयार केले आहे.
- रे-बॅन स्टोरीजची किंमत अंदाजे २१,००० रुपये आहे.
- हे २० स्टाइल कॉम्बिनेशनमध्ये ऑनलाइन आणि अमेरिकेतील निवडक किरकोळ स्टोअरमध्ये तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली आणि ब्रिटन मध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.
- ते भारतात कधी लॉंच केले जाईल याबद्दलची कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे.
प्रायव्हसीवा मोठा धोका
- स्मार्ट ग्लासेसमुळे प्रायव्हसीला धोका आहे.
- यामध्ये लोक तुमचा फोटो घेऊ शकतात आणि तुमच्या परवानगीशिवाय व्हिडीओही बनवू शकतात.
- काचेमध्ये एलईडी लाईट आहे असे फेसबुक म्हणत असले तरी, त्यामुळे कोणीतरी तुमचा फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे हे कळेल.
- हा चष्मा दिसायला साधारण गॉगलसारखाच आहे.
- एखाद्याची हेरगिरी करण्यासाठी याचा आरामात वापर केला जाऊ शकतो.
पाहा व्हिडीओ:
रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र