-
अपेक्षा सकपाळ
अनिल कपूरचा नायक चित्रपट आजही सर्वांना माहित आहे. आता या चित्रपटाची कथा उत्तराखंडमध्ये सत्यात उतरली आहे. सृष्टी गोस्वामी राष्ट्रीय बालिका दिनी एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनली होती. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिवस असतो, त्यानिमित्त सृष्टीला ही संधी देण्यात आली होती. उत्तराखंडमधील हरिद्वारची राहणाऱ्या सृष्टीने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळली.
सृष्टी गोस्वामी दुपारी बाराच्या सुमारास देहरादूनच्या विधानसभेत पोहोचली. तिथे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावतही तेथे होते. देशामध्ये ही अशी घटना पहिल्यांदाच घडली. मुख्यमंत्री असतानाही कोणीतरी दुसरी व्यक्ती एका दिवसाची मुख्यमंत्री बनला. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सृष्टीने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली.
एका दिवसाची मुख्यमंत्री म्हणून सृष्टीने विकास कामांचा आढावा घेतला. त्यासाठी काही बैठकांनाही ती उपस्थित होती. दुपारी ३ नंतर तिने बालिका निकेतनाची पाहणी केली. तेथेच ती दुपारी बालिकांसोबत जेवली.
मुख्यमंत्री सृष्टी गोस्वामींच्या बैठकांसाठी मुख्य अभियंता-सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी-पर्यटन विकास परिषद, संचालक उरेडा एनर्जी पार्क, मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग, संचालक महिला सशक्तीकरण व बाल विकास विभाग, संचालक माध्यमिक आरोग्य व कुटुंब कल्याण, संचालक माध्यमिक शिक्षण, सचिव भांडवल सामान्य प्रशासन, संचालक ग्रामविकास विभाग, जिल्हा दंडाधिकारी देहरादून, महासंचालक उद्योग संचालनालय, पोलिस महासंचालक या १२ विभागांचे अधिकारी येथे उपस्थित होते.
कोण आहे सृष्टी गोस्वामी?
- सृष्टी गोस्वामी खूप हुशार आहे
- सृष्टी गोस्वामी विद्यार्थिनी आहे
- सृष्टी उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये राहते
- २०१९ मध्ये थायलंडमध्ये झालेल्या मुलींच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व परिषदेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते
- २०१८ मध्ये बाल विधानसभेत बालिका आमदार म्हणूनही सृष्टी गोस्वामीची निवड झाली होती
- भुवनेश्वरी आश्रम आणि राज्य बाल संरक्षण आयोग या स्वयंसेवी संस्थेने ही विधानसभा स्थापन केली आहे
- मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हा त्यांचा हेतू आहे
पाहा व्हिडीओ :