मुक्तपीठ टीम
नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरजने आपली एक इच्छा पूर्ण केली आहे. नीरज चोपडाचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याचे हे स्वप्न म्हणजे आई-वडिलांना विमानाने घेऊन जाण्याची. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरजने ट्विटरवर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली. फोटोमध्ये नीरज त्याच्या आई-वडिलांसोबत विमानात बसून खूप आनंदात दिसत आहे.
नीरजच्या शब्दात स्वप्नपूर्ती
- नीरजने फोटोसह एक सुंदर आणि भावनापूर्ण संदेश लिहिला आहे.
- आज जीवनातील एक स्वप्न पूर्ण झाले.
- मी माझ्या आई-वडिलांना पहिल्यांदा विमानात बसताना पाहिले.
- प्रत्येकाच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच कृतज्ञ आणि आभारी राहीन.
- त्याच्या या पोस्टवर चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
नीरज चोपडाची भारतासाठीची सुवर्ण कामगिरी
- भारतीय लष्करात अधिकारी नीरजने टोकियोमध्ये झालेल्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. २. त्याने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून देशासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.
- नीरजच्या या पदकामुळे भारताचे ट्रॅक अँड फिल्डमध्ये पदकाचे स्वप्न पूर्ण झाले.
- अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यासह अभिनव बिंद्रा व्यतिरिक्त, ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा खेळाडू देखील तो आहे.
भारताने टोकियोमध्ये नीरजच्या सुवर्ण पदकासह एकूण ७ पदके जिंकली, जी ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. जेव्हा नीरज घरी परतला तेव्हा त्याचे एखाद्या सेलिब्रिटीसारखे स्वागत करण्यात आले.