मुक्तपीठ टीम
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्ष सक्रिय झाले आहेत. पुणे मनपाच्या निवडणुकीसाठी मनसे कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी पुण्यात आले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्याने त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.‘तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.
राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मागील दोन महिन्यात राज ठाकरेंचा पुण्याचा आठवा दौरा आहे. या बैठकिला ८ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
- माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते.
- फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा.
- तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार.
फक्त गणेशोत्सवाला नको.
ही कोणती पद्धत
- गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू.
- यातलं काळंबेरं समजून घ्यायला पाहिजे
- सध्या मनपाच्या निवडणुका राज्य सरकारला नको आहेत.
- हे कदाचित सरकारच्या फायद्याचं असेल.
- यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे.
- सरकारलाच आता या निवडणुका नको आहेत .
- कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार.
- कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार.
- हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा
- नुसतं ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको.
- पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही.
- सरकारकडे यंत्रणा आहे.
- त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं.
- ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही.
बरं चाललंय सरकारांचं
- कोरोनाची भीती दाखवली जातेय
- या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही.
- आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा.
- बरं चाललंय सरकारांचं.
- केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे.
- तिसऱ्या चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे.
- भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?